वर्धा : स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 16:17

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील आरावली स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट झाल्याने १ मजूर ठार तर ६ मजूर गंभीर जखमी झाले. सकाळी १० च्या सुमारास हा स्फोट झाला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

फटाका स्फोटातील ४ जणांचे मृतदेह हाती

Last Updated: Tuesday, February 21, 2012, 11:38

सोलापूर जिल्ह्यात भाळवणीत सागर फायर वर्क्स या फटक्यांच्या कारखान्यात स्फोट झालाय. या स्फोटात ३० जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येतेय. यामधील ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, चारही मृतदेह महिलांचे आहेत तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.

फटाका कारखान्यात स्फोटात ३० जण मृत्यूमुखी पडल्याची भीती

Last Updated: Monday, February 20, 2012, 23:02

सोलापुरातील सर्वात मोठ्या फटक्याच्या कारखान्यात स्फोट होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच महिला आणि दोन पुरूष ठार झाल्याची घटना घटली. स्फोटानंतर आगीचा भडका उडल्याने कारखान्यात अनेक कामगार अडकल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, फायरब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याचेही सांगण्यात येत आहे.