नागपुरात संतप्त जमावाचा गुंडाच्या घरावर हल्ला, गुंड ठार

Last Updated: Thursday, January 23, 2014, 11:43

आणखी एका गुंडाचा जमावाने खून केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान तालुक्यात घडली आहे. कन्हान तालुक्यातील सत्रापुर परिसरातील मोहनीश रेड्डी नावाच्या गुंडावर आज सकाळी गावातीलच लोकांनी राहत्या घरी त्याच्यावर हल्ला करून जीवानिशी मारलं.

इक्बाल शेखला ठेचणाऱ्या नागरिकांची न्यायालयासमोर दगडफेक

Last Updated: Monday, March 4, 2013, 15:32

नागपुरात संतप्त जमावानं जिल्हा न्यायालयासमोर दगडफेक केलीय. नागपुरातल्या वसंतराव नाईक झोपडपट्टीतले हे नागरिक आहेत. पोलिसांनी न्यायालयात जाण्यास मज्जाव केल्यानं संतप्त झाल्यानं या नागरिकांनी दगडफेक केलीय.

गुंडाची ठेचून हत्या... हत्येनंतर दुसरी हत्याही उघडकीस

Last Updated: Wednesday, October 10, 2012, 14:41

मंगळवारी सायंकाळी नागपुरात संतप्त जमावानं एका गुंडाला ठेचून ठार मारल्याची खळबळजनक घटना घडली. इक्बाल शेख असं या गुंडाचं नाव आहे. या हत्येनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत इक्बाल शेख आणि त्याच्या भावानं यापूर्वी आणखी एक हत्या केल्याचं सत्य पुढे आलंय.

महिला पोलिसांची छेड, शस्त्रे पळविलीत

Last Updated: Sunday, August 12, 2012, 10:56

मुंबईतल्या सीएसटी परिसरात हिंसक तोडफोडीनंतर निर्माण झालेला तणाव निवळलाय. कालच्या हिंसक आंदोलनप्रकरणी 23 जणांना अटक करण्यात आलीये. दरम्यान, या जमावाने महिला पोलिसांची छेडछाड काढून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. हल्ल्यात ४५ पोलीस जखमी झाले आहेत.

कोल्हापूर अशांत जिल्हा, जमावबंदी लागू

Last Updated: Saturday, November 5, 2011, 07:44

कोल्हापूर मध्ये ऊसाच्या दरवाढीसाठी आंदोलन केले जात आहे आंदोलनला दडपण्यासाठी कोल्हापूर मध्ये जमाव बंदी लागू केली आहे. ऊसाची दरवाढ हो प्रश्न गंभीर बनू नये म्हणून ही जमाबबंदी लागू करण्यात आली आहे.