गोव्यात मेळा... मराठी चित्रपटांचा

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 18:03

यंदाच्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाला ८ जूनपासून सुरुवात होतेय. महोत्सवाचं उद्घाटन दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते होणार आहे. एकूण १७ दर्जेदार चित्रपट या महोत्सवात दाखवली जाणार आहेत.

'अजिंठा'चा मार्ग मोकळा

Last Updated: Friday, May 11, 2012, 09:31

कलादिग्दर्शक नितीन देसाईंच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'अजिंठा' सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट देऊन मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादाला सेन्सॉर बोर्डाने पूर्णविराम दिला. बंजारा समाजाने आक्षेप घेतल्याने 'अजिंठा'ला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते आणि त्यामुळेच ऐनवेळी सिनेमाचा प्रीमियर रद्द करण्यात आला होता.

'राजा शिवछत्रपती' आता मोठ्या पडद्यावर

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 19:37

नितीन देसाईंची निर्मिती असलेली ‘राजा शिवछत्रपती’ ही मालिका आता चित्रपट रुपानं पुन्हा आपल्या भेटीला येत आहे. दोनशेपेक्षा अधिक भागांची ही मालिका आता चक्क दोन तास १० मिनिटांच्या सिनेमाच्या रुपात येत आहे.