दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

Last Updated: Monday, October 28, 2013, 09:57

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

मुंबईचे करणार शांघाय, शहर पुनर्बांधणीचा प्रस्ताव

Last Updated: Saturday, June 22, 2013, 19:48

मुंबई, ठाण्यासह लगतच्या शहरांमधल्या अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या इमारतींचा प्रश्न गंभीर बनलाय... मुंब्रा इथल्या दुर्घटनेनंतर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. त्यामुळं आता शहरांच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सरकारनं तयार केलाय.

मंत्रालय पाडा, पवारांच्या प्रस्तावाला खोडा!

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 16:04

भीषण आगीत होरपळून निघालेल्या मंत्रालयाचे तळमजलासह एक, दोन आणि तीन हे मजले पूर्णपणे सुरक्षित असून चार, पाच आणि सहा हे तीन मजले सर्वसाधारणपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. त्यामुळे ही इमारत पाडणार नसल्याचे जवळपास निश्‍चित आहे. त्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याचा शरद पवार यांनी दिलेला प्रस्ताव मागे पडण्याची शक्यता आहे.

चाळींच्या पुनर्बांधणी मागणीकडे दुर्लक्ष

Last Updated: Saturday, June 9, 2012, 15:41

मुंबईच्या चर्चगेट जवळील ए,बी,सी आणि डी रोड परिसरात राहणा-या नागरिकांचा पुनर्बांधणीचा मागणीकडे दुर्लक्ष करणा-या हेरिटेज कमीटीवर माजी सदस्यांनी जोरदार टीका केली आहे. इथल्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या विषयावर प्रशासनानं लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.