बीडमध्ये मेडिकल दुकानावर छापे

Last Updated: Monday, June 4, 2012, 17:34

बीडमध्ये स्त्रीभ्रूण हत्येचं प्रकरण उघडकीस आल्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं जिल्ह्यातल्या मेडिकल दुकानावर छापे टाकायला सुरु केलीये. १२ औषध निरीक्षक आणि दोन सहआयुक्त मागील दोन दिवसांपासून बीडमध्ये तळ ठोकून आहेत.

खासगी सोनोग्राफी सेंटर्स होणार बंद

Last Updated: Monday, June 4, 2012, 17:34

बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारने आता कडक पाऊल उचलण्यास सुरुवात केलीय. यानुसार बीड जिल्ह्यातील खासगी सोनोग्राफी सेंटर्स बंद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे.

फरार डॉ. मुंडेकडे कोट्यवधींची माया

Last Updated: Monday, June 4, 2012, 18:56

स्त्री भ्रूण हत्येतील प्रमुख आरोपी डॉ. सुदाम मुंडे याच्याकडे कोट्यवधी रूपयांची माया सापडली आहे. तो १५० कोटी संपतीची धनी असल्याचे उघड झाले आहे. मुंडे हा अनेक दिवसांपासून फरार असल्याने त्याची माहिती देणाऱ्यासाठी ४० हजारांचे बक्षिसही जाहीर केले आहे.

स्त्री भ्रूण हत्या प्रकरण; बीडमध्ये कारवाईचा धडाका

Last Updated: Sunday, June 3, 2012, 09:20

बीडमधल्या बार्शी नाका परिसरातल्या पुलाखालच्या नदी पात्रात दोन आणि काकाधीरा इथं एक अर्भकं आढळून आल्यानंतर डॉक्टरांनी क्रौर्याची किती परिसीमा गाठली हे पुन्हा एकदा उघड झालं. झी 24 तासनं शनिवारी दुपारी सर्वात आधी हा प्रकार उघड केला. त्याची मुख्यमंत्र्यांनी तातडीनं दखल घेत कारवाईचे आदेश दिले. यानंतर लगेचच सानप हॉस्पिटलच्या डॉ. शिवाजी सानपसह तिघांना अटक करण्यात आलीए.