'मुंबई गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीच हवी'

Last Updated: Saturday, September 14, 2013, 15:08

दिल्ली गँगरेप प्रकरणाशी मिळती जुळती घटना नुकतीच एका फोटो पत्रकाराच्या बाबतीत मुंबईत घडली. दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईत फोटो जर्नलिस्टवर झालेल्या गँगरेप प्रकरणातील आरोपींनाही फाशीचच शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी खुद्द पोलीसच कोर्टात करणार आहेत.

मुंबई गँग रेप : फॉरेन्सिक टीम मुंबईत,‘परागकण’ची मदत

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 17:28

मुंबईत महिला फोटोग्राफर बलात्कार प्रकरणी तपास करण्यासाठी दोन फॉरेन्सिक टीम मुंबईत दाखल झाली आहे. केंद्रीय फॉरेन्सिक आणि गुजरात फॉरेन्सिक टीमनं शक्ती मील कंपाऊंड परिसरात पाहणी केली.

मुंबई गँग रेप : ती पाच रेखाचित्र कोणी काढलीत?

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 12:14

पोलिसांना मुंबई सामूहिक बलात्कारातील पाचही आरोपींनी पकडण्यात यश आले. मात्र, यामागे कोणाचा हातभार लागला? या प्रश्नाचे उत्तर आहे, एक शिक्षक. रेखाचित्रकार नितीन यादव, सादिक शेख यांच्या मदतीने पाचही आरोपींच्या मुसक्या आवळता आल्यात. नितीन हे कला शिक्षक आहेत.

‘त्या’ नराधमांनी आणखी एका महिलेवर केला होता गँगरेप!

Last Updated: Monday, August 26, 2013, 10:48

मुंबई गँगरेप प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींनी याआधी आणखी एका महिलेवर गँगरेप केला असल्याची धक्कादायक माहिती समोर येतेय. मात्र याबद्दलची अद्याप पुष्टी झाली नाहीय.

मुंबई गँगरेप : पाचव्या आरोपीला दिल्लीत अटक

Last Updated: Sunday, August 25, 2013, 12:49

मुंबईतल्या महिला फोटोग्राफवर गँगरेप प्रकरणी मुंबई पोलिसांना पाचही आरोपींना अटक करण्यात यश मिळालंय. या प्रकरणातील पाचवा आरोपी सलीम अन्सारी याला मुंबई क्राइम ब्रॅंचच्या पोलिसांना आज दिल्लीत अटक केली.

मुंबई गँगरेप : चौथ्या आरोपीला अटक

Last Updated: Sunday, August 25, 2013, 09:02

मुंबई गँगरेप प्रकरणातील चौथा आरोपीही पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. आज पहाटे चौथ्या आरोपीला अटक करण्यात आलीय. सिराज रेहमान असं या आरोपीचं नाव आहे. त्याला गोवंडी परिसरातून अटक करण्यात आलीय. तर या प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीला शनिवारी सायंकाळी महालक्ष्मी परिसरातून अटक करण्यात आली होती.