ट्रेनी मारून नेताहेत वेळ, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Last Updated: Friday, July 20, 2012, 18:27

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.

बस आली धावून...

Last Updated: Friday, July 20, 2012, 17:46

जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

गेल्या वर्षीही ६० मोटरमनने केला होता संप!

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:41

गेल्या वर्षी सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते. त्यामुळे चर्चगेटहून एकही गाडी सुटू शकली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते.

रेल्वे वाहतूक खोळंबली, २०० मोटरमन अचानक रजेवर

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:55

मुंबई पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडली आहे. अचानक १०० मोटरमन हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मनमानीविरोधात मोटरमन हे रजेवर गेले आहेत.