चंद्रपूर साहित्यनगरीत 'माय मराठी'चा जयघोष

Last Updated: Saturday, February 4, 2012, 09:04

डोईवर ग्रंथ घेतलेल्या पारंपरिक वेशभूषेतील तरुणी, शिस्तबद्ध लेझीमपथक, मोरपंखांची टोपी घातलेला वासुदेव, अंगावर फटके मारणारा मरीआईचा भोप्या, अश्‍वारूढ मावळे, सजावट केलेले उंट, वाद्यवृंद पथकासह राष्ट्रसंतांच्या भजनांच्या सुरांनी नटलेल्या ग्रंथदिंडीने केलेल्या ‘माय मराठी'च्या जयघोषात अवघी चंद्रपूरनगरी दुमदुमून गेली. कर्मवीर दादासाहेब कन्नमवार सभामंडपात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌घाटन झाले.

'प्रक्षुब्ध लिखाणापेक्षा, मन शांत करणारं लिहा'

Last Updated: Thursday, February 2, 2012, 13:16

८५ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वसंत आबाजी डहाके चंद्रपूरात दाखल झाले आहेत. आणि शहरातल्या वेगवेगळ्या साहित्यिक कार्यक्रमांना हजेरी लावली. सध्या नवी पुस्तकं, कथा, कादंबऱ्या हजारोंनी तयार होत आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली प्रक्षुब्ध लिखाण करण्यापेक्षा समाजमन शांत करणारं लिखाण झालं पाहिजे.