मी सचिनला केलं निवृत्त, पाक क्रिकेटरचा दावा

Last Updated: Saturday, August 24, 2013, 15:53

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या कारकिर्दीतील अखेरच्या एकदिवसीय सामन्यात मी त्याला बाद केल्यानेच सचिनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याचा, अजब दावा पाकिस्तानचा फिरकीपटू सईद अजमल याने केला आहे.

सचिनपेक्षा लाराच श्रेष्ठ; पाकचे फुत्कार

Last Updated: Friday, August 9, 2013, 19:08

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग या दोघांपेक्षा वेस्ट इंडिजचा ब्रायन लाराच श्रेष्ठ असल्याचं मत पाकच्या आफ्रिदीनं व्यक्त केलंय.

‘स्टीव्ह वॉ’नं केली ‘दादा’ची स्तूती

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 15:13

काही दिवसांपूर्वी टीका करणारा ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू स्टीव्ह वॉनं भारताचा माजी कप्तान सौरव गांगुलीवर आता स्तुतिसुमनं उधळतोय. ‘सौरव गांगुलीनंच भारतीय टीममध्ये विश्वास निर्माण केला’ या शब्दात त्यानं दादाची स्तुती केलीय.

संसदेतल्या गोंधळानंच केलं सचिनचं स्वागत!

Last Updated: Monday, August 5, 2013, 15:38

राज्यसभेचा खासदार असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याची दिवशी राज्यसभेत हजेरी लावली. पहिल्याच दिवशी सचिन संसदेत हजर असल्यानं अर्थातच सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या.

सचिनने सन्मानाने निवृत्ती घ्यावी - नाना पाटेकर

Last Updated: Monday, December 17, 2012, 13:03

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या चाहत्यांच्या मनात राजा आहे, आणि म्हणून निवृत्ती बद्दल त्यानं स्वत:च विचार करावा असं मत सिने अभिनेता नाना पाटेकर यानं व्यक्त केलय.

सचिन फ्लॉप; सिलेक्शन कमिटीचा वाढणार ताप?

Last Updated: Friday, November 30, 2012, 13:54

अंतिम निर्णय हा नेहमी सिलेक्शन कमिटीच घेते. माझ्या मते भविष्यातील वाटचालीविषयी सिलेक्शन कमिटी सचिनशी संवाद साधेल आणि त्यानंतरच निर्णय घेईल’ असं माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलंय.

रागावलेल्या बायकोचा सामना करणं महाकठिण - सचिन

Last Updated: Friday, November 23, 2012, 20:49

सचिन तेंडुलकरनं आपल्या बॅटींगनं भल्याभल्यांची दाणादाण उडवलीय पण बॅटींगपेक्षा रागावलेल्या पत्नीचा सामना करणं कठीण असल्याचं मास्टर ब्लास्टरला वाटतंय

द्रविडच्या हस्ते ‘बॉर्न टू बॅट’चं प्रकाशन...

Last Updated: Friday, November 23, 2012, 16:25

‘बॉर्न टू बॅट’ या पुस्तकाचं नुकतंच मुंबईत उद्घाटन झालंय. क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याच्या कारकीर्दीवर या पुस्तकात प्रकाश टाकलाय.

बॅटिंगचा कंटाळा येईपर्यंत खेळणार’- सचिन

Last Updated: Thursday, August 30, 2012, 20:39

‘द वॉल’ राहुल द्रविड आणि ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ लक्ष्मणनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पुन्हा एकदा सचिन कधी निवृत्ती घेणार? या प्रश्नावर सचिनसोडून इतरांचा खल सुरू झाला.

सचिनने निवृत्ती का पत्करावी?- लता मंगेशकर

Last Updated: Tuesday, March 20, 2012, 16:35

सचिनने निवृत्ती का पत्करावी हा सवाल आहे गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा...सचिनने आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी शंभरावे शतक झळकावल्यामुळे लता मंगेशकरांना आनंद झाला आहे. पण त्याचबरोबर सचिनने आता निवृत्त व्हावं असं सूचवलं जात असल्यामुळे त्या नाराजही आहेत.

भविष्यवेत्त्याच्या मते सचिन का नंबर आयेगा...

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 17:50

सचिन तेंडूलकरच्या शंभराव्या शतकाची प्रतिक्षा सर्वांनाच लागून राहिली आहे आणि तो स्वत:ही शतकांची सेंच्युरी कधी प्रत्यक्षात उतरेल याबाबत साशंक आहे. पण केरळचे प्रख्यात न्युमेरोलॉजिस्ट एम.के.दामोदरन यांना मात्र लवकरच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर परत एकदा फूलफॉर्ममध्ये येईल याची खात्री वाटत आहे.

वॉर्नने दिल्या सचिनला शुभेच्छा

Last Updated: Thursday, December 22, 2011, 13:24

ऑस्ट्रेलियन स्पिनर शेन वॉर्नला सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं १०० वं शतक ऑस्ट्रेलियाविरुद्धाच्या दौऱ्यातच झळकावेल या बद्दल काहीच शंका वाटत नाहीये. वॉर्नने या महान फलंदाजाला २६ डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीतच या विश्व विक्रमाचा टप्पा गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

सोनेरी क्षणांना सोनेरी नजराणा

Last Updated: Saturday, November 19, 2011, 10:21

सचिन तेंडूलकरने वेस्ट इंडिज विरुध्दच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात जर हे विक्रमी शतक ठोकलं तर त्याच्यावर १०० सोन्याची नाण्यांचा वर्षाव करण्याचं मुंबई क्रिकेट असोशिएशनने ठरवलं आहे.

बाप से बेटा सवाई

Last Updated: Thursday, November 17, 2011, 11:39

सचिन तेंडूलकर आणि विनोद कांबळी यांनी २३ वर्षापूर्वी हॅरिस शिल्डमध्ये ६६४ रन्सची विश्वविक्रमी भागिदारी करुन इतिहास घडवला होता. आता इतिहासाची जणू पुनरावृत्ती होताना दिसत आहे पण त्यात वेगळंपण आहे. सचिनने बॅटच्या जोरावर इतिहास घडवला तर त्याचा मुलगा अर्जूनने आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली.