ठाणे पालिकेत महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध

Last Updated: Friday, October 11, 2013, 14:13

ठाणे महापालिका स्थायी समिती निवडणुकीत महायुतीने बाजी मारली. महायुतीचे विलास कांबळे बिनविरोध स्थायी समितीवर निवडून आले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला धूळ चारली.

ठाणे पालिकेत रंगत, राष्ट्रवादीच्या साळवींचा राजीनामा

Last Updated: Friday, October 11, 2013, 09:42

ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीची निवडणूक आज होणार आहे. या निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश साळवी यांनी राजीनामा दिला. ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. दरम्यान भाजपचे संजय वाघुलेही अर्ज मागे घेणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या या खेळीमुळे आघाडीपुढे पेच निर्माण झाल्याचं मानलं जातंय.

सेना-भाजप युतीने केलं मनसेचं ‘कल्याण’

Last Updated: Monday, April 8, 2013, 20:21

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीमुळे मनसेचं कल्याण झाल्याचे पाहायला मिळाले. पालिकेत मनसेच्या वाट्याला सभापतीपदी आले आहे. मनसेनेने युतीला सहकार्य केलं तर युतीने मनसेला साथ दिल्याचे चित्र पालिकेत पाहायला मिळाले.