टेंपो दरीत कोसळून अपघात, ९ गंभीर

Last Updated: Saturday, February 8, 2014, 10:59

खेड-दापोली रस्त्यावर कुवे घाटात टेंपो दरीत कोसळलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेंपो दरीत कोसळला. टेंपोमध्ये १४ कंत्राटी कामगार प्रवास करत होते. चौदापैकी ९ कामगार गंभीर जखमी आहेत. जखमींवर दापोलीतल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरुयात.

ऐन प्रजासत्ताक दिनी मणीपूर बॉम्बस्फोटांनी हादरलं

Last Updated: Sunday, January 26, 2014, 15:31

मणीपूरची राजधानी इन्फाळमध्ये आज सकाळी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा सुरू असताना दोन शक्तीशाली बॉम्बस्फोट झाले. बॉम्ब स्फोटांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ९ जण जखमी झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिलीय.

लातूर-उदगीर एसटीत स्फोट, १९ जण जखमी

Last Updated: Friday, May 10, 2013, 21:18

लातूर उदगीर मार्गावरील नळेगाव येथील बस डेपोमध्ये आज सायंकाळी एसटीमध्ये स्फोट होऊन १९ जण जखमी झाले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पंजाब मेल घसरली... १९ जण जखमी

Last Updated: Sunday, May 6, 2012, 11:28

मुंबई- फिरोजपूर पंजाब मेलला हरियाणातल्या रोहतकमध्ये अपघात झाला आहे. अपघातात रेल्वेचे आठ डबे रुळांवरुन घसरले आहेत. या अपघातात १९ प्रवासी जखमी झाले आहेत.