श्रीहरिकोटावरून जीसॅट-14 उपग्रहासह जीएसएलव्ही डी-5 चं यशस्वी उड्डाण

Last Updated: Sunday, January 5, 2014, 20:13

भारताच्या जीसॅट-14 उपग्रहाचं आज श्रीहरिकोटावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरवरुन हा उपग्रह आकाशात झेपावला. जीसॅट-14 जीएसएलव्ही इन्सॅट डी-5 प्रक्षेपक 1980 किलो वजनाचा आहे. सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांनी हे उड्डाण करण्यात आलं.

भारताचं ‘जीएसएलव्ही-डी ५’ आज झेपावणार आकाशात!

Last Updated: Sunday, January 5, 2014, 14:51

भारताचा ‘जीसॅट-१४’ हा दळणवळण उपग्रह आज अवकाशात झेपावणार आहे. ‘जीएसएलव्ही-डी ५’ (जियो सिंग्क्रनस सेटेलाईट लाँच व्हेईकल) या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हा उपग्रह अवकाशात सोडण्यात येणार आहे.

मंगळयानाने काढले पृथ्वीचे छायाचित्र

Last Updated: Thursday, November 21, 2013, 19:40

भारताची मंगळयान मोहीम यशस्वी झाली आहे. या यशस्वी मोहिमेनंतर प्रथमच मंगळयानाने आपला पहिले छायाचित्र पाठविले आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मंगळयानाने पाठविलेला फोटो इस्रोने प्रसिद्ध केला आहे. हे छायाचित्र फेसबुकवर अप करण्यात आले आहे.

`मंगळ` प्रवासाचा खर्च रिक्षा-टॅक्सीपेक्षाही कमी!

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 16:28

सध्या भारताला खरंच या मंगळ मोहिमेची गरज होती काय? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते... पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल की, आपण रिक्षा प्रवासासाठी जेवढे पैसे मोजतो त्यापेक्षा कमी खर्चात मंगळयान प्रवास करतंय.

मंगळयानालाही टोचणार इंजेक्शन!

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 10:26

मंगळयानात आलेला अथडळा दूर झाल्यानं भारतीय शास्त्रज्ञांच्या जीवात जीव आलाय. आता त्यांचं पुढचं टार्गेट आहे... ‘इंजेक्शन’!

मंगळयानात आलेला अथडळा दूर!

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 20:58

भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयानाची कक्षा वाढविण्याच्या चौथ्या टप्प्यात यानाची कक्षा एक लाखांहून अधिक किलोमीटरपर्यंत वाढविण्यात भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) यश आल्यानं ही मोहिम पुन्हा पूर्वपदावर आली आहे.

पाहा... नेमकं काय आहे हे `मार्स मिशन`

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 08:31

इस्रोनं आपल्या मोहीमेला `मंगळयान` असं सुटसुटीत नाव दिलंय. १३५० किलो वजनाच्या या उपग्रहावर पाच शास्त्रीय उपकरणं आहेत. ही उपकरणं नेमकी कशी आहेत आणि त्यांच्या मदतीनं मंगळाविषयी कोणती नवी माहिती मिळू शकते... पाहुयात...

मंगळयान : भारताची मंगळाला `भाऊबीज भेट`!

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 16:26

आज दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोचं मंगळयान आकाशात झेपावणार आहे.

भारताच्या ‘मंगळ मिशन’चं काउंटडाऊन सुरू

Last Updated: Sunday, November 3, 2013, 15:51

भारताच्या महत्वकांक्षी मंगळ मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी अवकाशयानाच्या प्रक्षेपणासाठी ५६ तास ३० मिननिटांचं अंतिम काउंटडाऊन सुरू करण्यात आलं.

प्रतिक्षा GSLV-D-5 च्या यशाची.....

Last Updated: Sunday, September 8, 2013, 18:51

इस्त्रोच्या GSLV-D-5 या मोहिमेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मोहिमेमध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन वापरले जात आहे. इस्त्रोच्या इतिहासातील चांद्रयान मोहिमेनंतरची सर्वात मोठी महत्वकांक्षी मोहिम ठरणार आहे. भविष्यातील मोठ्या मोहिमांचा पाया ही मोहिम रचणार आहे.

जीएसएलव्ही डी ५चं प्रक्षेपण पुढे ढकललं!

Last Updated: Monday, August 19, 2013, 17:31

जीएसएलव्ही डी ५चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलंय. ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून हे प्रक्षेपण होणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे प्रक्षेपण पुढे ढकलल्याचा इस्रोनं जाहीर केलंय.

अवकाश कवेत घ्यायला ‘जीएसएलव्ही’ सज्ज

Last Updated: Monday, August 19, 2013, 11:13

सलग दोन वेळा अपयश आल्यानंतर अवकाशात भरारी घेण्यासाठी ‘जीएसएलव्ही डी-५’ सज्ज झालंय. आज संध्याकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी श्रीहरीकोटा इथून जीएसएलव्ही ५चं उड्डाण होणार आहे.

भारताची आकाशी झेप, मोजक्या देशांच्या यादीत

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 12:12

नेव्हिगेशन उपग्रह असलेल्या मोजक्या देशांच्या यादीत आता भारतानं स्थान पटकावलंय. IRNSS-1A या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण काल रात्री झालं.

भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Last Updated: Thursday, April 26, 2012, 09:14

अंतरीक्ष अभियानात इस्त्रोनं आणखी भरारी घेतली आहे. श्रीहरीकोटा इथून ' रिसॅट- 1' या उपग्रहाहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या कामगिरीबद्दल पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी इस्त्रोचे अध्यक्ष के राधाकृष्णन यांचे दूरध्वनीवरून खास अभिनंदन केले आहे.