बिहारचे नवे मुख्यमंत्री ठरणार? लालूंना घातली साद

Last Updated: Sunday, May 18, 2014, 10:16

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. लोकसभा निवडणुकीत बिहारमधील सत्ताधारी जेडीयू पक्षाचा पार धुव्वा उडाल्यानं, मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेडीयूनं आज आमदारांची बैठक बोलावलीय.

'चिल्लर पार्टी' नव्हे ही तर 'थिल्लर पार्टी'!

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 15:52

`लोकशाही` या शब्दाला लाजवेल अशा घटना सध्या संसदेत आणि विधानसभेसारख्या ठिकाणी घडताना दिसत आहेत. नुकतंच लोकसभेत खासदारांनी `मिरची स्प्रे कांड` घडवून आणलं होतं... त्यानंतर आज पुन्हा एकदा `उघडबंब` नेत्यांनी संसदीय परंपरा धुळीला मिळवल्याचं दिसून आलं.

`दोषी आमदार, खासदारांना निवडणूक बंदी`

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 15:59

जेलची सजा भोगून बाहेर आलेल्या आणि जेलमध्ये असणाऱ्यांना आता निवडणूक लढविता येणार नाही. असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आमदार, खासदार यांनी दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली असेल तर त्यांनाही निवडणूक लढविता येणार नाही.

गुजरात विधानसभेत 'डर्टी पिक्चर'!

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 18:44

कर्नाटक विधानसभेत अश्लील चित्रफित पाहणाऱ्या तीन मंत्र्यांना सत्तेची खूर्ची सोडावी लागली होती. आता गुजरात सरकारमधील आमदारांनी कर्नाटकचा 'पोर्नगेट'चा कित्ता गिरवला आहे. विशेषबाब म्हणजे सभ्य समजल्या जाणाऱ्या भाजपच्या आमदारांचा यात समावेश आहे. दोन्ही राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे.

पुण्यातले 'मालामाल' उमेदवार

Last Updated: Thursday, February 2, 2012, 21:47

पुण्यातले आमदार, खासदारच नाही तर नगरसेवक आणि जिल्हा परिषद उमेदवारांची मालमत्ताही कोटींच्या घरात आहे.

'विधान भवन' ते ‘विद्या बालन’

Last Updated: Saturday, December 17, 2011, 03:16

नागपूरच्या थंडीत अधिवेशनाचं कामकाज तापलं असताना काल रात्री अनेक पक्षांच्या आमदारांनी विरंगुळ्यासाठी थेट थिएटर गाठलं आणि ‘डर्टी पिक्चर’ पाहिला. विद्याच्या मादक अदांमध्ये गुंग असतानाच मीडिया तिथे पोहोचली, तेव्हा आमदारांचीही पळापळ झाली.