राहुल नार्वेकरांनी घेतली शरद पवारांची भेट!

Last Updated: Sunday, March 16, 2014, 18:42

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी शरद पवारांची मुंबईतल्या निवासस्थानी भेट घेतलीय. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नार्वेकर यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. मात्र, नार्वेकरांनी विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना अंधारात ठेवून माघार घेतली होती. त्यामुळं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही त्यांच्यावर नाराज आहे.

भाजपकडून विधानपरिषदेसाठी तावडे, फुंडकरांना उमेदवारी

Last Updated: Sunday, March 9, 2014, 22:44

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं विनोद तावडे आणि पांडुरंग फुंडकर या दोन ज्येष्ठ नेत्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिलीय. या दोन्ही नेत्यांची ही तिसरी टर्म असेल.

विधान परिषदेसाठी काँग्रेसची राठोड, देशमुख, रघुवंशींना उमेदवारी

Last Updated: Monday, March 10, 2014, 11:13

विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवाजीराव देशमुख, हरिभाऊ राठोड आणि चंद्रकांत रघुवंशी हे तीन उमेदवार काँग्रेसनं निश्चित केलेत. या निवडणुकीसाठी अर्जभरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यापूर्वी काँग्रेसनं ही यादी निश्चित केलीय. या यादीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची छाप आहे. संख्याबळाचा विचार करता हे तिन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात.

माजी आमदार लक्ष्मण मानेंवर बलात्काराचा गुन्हा

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 12:40

`उपरा` या गाजलेल्या कादंबरीचे लेखक आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायमस्वरूपी स्वयंपाकीण म्हणून घेतो असे सांगून वारंवार बलात्कार केल्याची तक्रार एका महिलेने केली आहे. या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

आ.प्रकाश शेंडगेंचा भाजपला रामराम

Last Updated: Monday, January 9, 2012, 19:28

आ.प्रकाश शेंडगेंनी भाजपला रामराम केला आहे. शेंडगेंनी पक्षात डावललं जात असल्याच्या कारणावरुन नाराजीने प्रदेश सरचिटणीसपदासह तीन पदांचा राजीनामा दिला होता. आ.प्रकाश शेंडगे हे गोपीनाथ मुंडे समर्थक आहेत. तसंच भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं.