अमिताभ बच्चन, ऐश्वर्या, सचिन तेंडुलकर झाले कामगार

Last Updated: Sunday, April 27, 2014, 09:12

गोव्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मोठा गैरव्यवहार झाल्याचं उघडकीस आलंय. सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची नावं गोव्यातील तिसवाडी तालुक्यातील चिंबल गावातल्या महात्मागांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील कामगारांच्या यादीत आल्यानं मोठी खळबळ उडालीय.

तुमच्या आई-वडिलांसारखंच जीवन तुम्ही जगणार?, मोदींचा सवाल

Last Updated: Sunday, January 12, 2014, 22:30

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात विजय संकल्प रॅलीसाठी उपस्थित झाले. त्यांनी इथं आपल्या भाषणानं लोकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलाय. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

आज गोव्यात धडाडणार मोदींची तोफ!

Last Updated: Sunday, January 12, 2014, 08:37

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींची गोव्यात रविवारी जाहीर सभा होतेय. या सभेसाठी भाजपनं जय्यत तयारी केलीय. भूतो न भविष्यती अशा या सभेसाठी तब्बल दीड लाख नागरिकांनी नोंदणी केलीय.

मनोहर पर्रीकरांच्या पुत्राचे शुभमंगल, गोव्यात दिग्गज उपस्थित

Last Updated: Friday, December 27, 2013, 11:31

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र अभिजित आणि डॉ. विनायक प्रभुदेसाई याची कन्या सई यांचा विवाहसोहळा गोव्यात साध्या पद्धतीने पार पडला. या सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.

नितेशला वाचविण्यासाठी `बाबा`नं फिरवला डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन

Last Updated: Thursday, December 5, 2013, 11:53

टोल नाक्यावर दादागिरी करून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या नितेश राणेंना पोलिसांनी अटक केल्यानंतर, नितेशला तिथून बाहेर काढण्यासाठी त्याच्या वडिलांनी म्हणजेच उद्योगमंत्री नारायण राणे यांनी थेट गोव्याच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला होता.

‘बॉम्बे टू गोवा’... आता जलमार्गानं!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 09:33

मुंबई-गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी खूशखबर आहे. मुंबई-गोवा प्रवास आता सागरी मार्गानं प्रवास करण्यात येणार आहे. कारण तब्बल २२ वर्षांनी मुंबई-गोव्यादरम्यान जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

शाळांतून वह्या-पुस्तकंच झाली हद्दपार...

Last Updated: Saturday, June 15, 2013, 12:20

गोव्यातील शिक्षण हायटेक करण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसलीय. याचाच एक भाग म्हणून आता गोव्यातील शाळांमधून वह्या-पुस्तकं बाद होणार आहेत.

`गृह आधार योजने`ची गोवेकरांना छाया!

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 11:51

ज्या कुटुंबांच वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांतल्या महिलांना प्रत्येक महिन्याला हजार रुपयांचं अनुदान गोवा सरकारकडून देण्यात येणार आहे.

गोव्यात पेट्रोल ११ रुपयांनी स्वस्त

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 16:20

३१ मार्चपासून पेट्रलचे भाव ५ रुपयांनी वाढणार असल्याची चर्चा चालू असतानाच गोवा सरकारने मात्र २ एप्रिलपासून पेट्रोलचे भाव ११ रुपये प्रति लीटरने स्वस्त केला आहे आहे.

पर्रिकर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

Last Updated: Saturday, March 10, 2012, 23:59

भारतीय जनता पक्षाच्या मनोहर पर्रिकर यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पर्रिकर यांच्याबरोबरच दयानंद मांदेकर, लक्ष्मीकांत पारसेकर, मतान्ही साल्दाना आणि फ्रान्सिस डिसोझा या भाजप आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.

मनोहर पर्रीकरच गोव्याचे मुख्यमंत्री होणार?

Last Updated: Thursday, March 8, 2012, 13:03

भाजप नेते मनोहर पर्रीकर यांनी गोव्यातील यशानंतर ‘लोककल्याण आणि स्वच्छ प्रशासन हीच आपल्या सरकारची प्रमुख कर्तव्य असतील.’ असा विश्वास व्यक्त केला आहे.

गोव्यात विक्रमी मतदान

Last Updated: Sunday, March 4, 2012, 16:43

गोवा विधानसभेच्या ४० जागांसाठी विक्रमी मतदान झालंय. सुमारे ८० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळापासून बहुतांश मतदान केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.