मोदी, सनी लिऑनच्या नावे जात प्रमाणपत्राची मागणी

Last Updated: Monday, May 5, 2014, 16:29

जात प्रमाणपत्राच्याबाबतीत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि पॉर्नस्टार सनी लिओन यांच्या नावाने चक्क ऑनलाईन अर्ज उत्तर प्रदेश प्रशासनाकडे आला आहे. या अर्जाने अधिकाऱ्यांना धक्काच बसलाय. बनावट अर्जाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

मनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 10:21

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

मुंबई महापालिकेत मनसेला धक्का

Last Updated: Thursday, March 14, 2013, 19:57

मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेविका गीता बाळा चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांचे नगरसेवक पद राहणार की जाणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.

जातप्रमाणपत्र अपिलासाठी १०आठवड्यांची मुदत

Last Updated: Saturday, May 5, 2012, 12:58

मुंबई हायकोर्टानं २७ हजार जातप्रमाणपत्र रद्दबातल केल्याचा राज्यातल्या महापालिका आणि जिल्हा परिषदांना फटका बसणार आहे. जातपडताळणी प्रमाणपत्रच रद्द झाल्यानं लोकप्रतिनिधींची पदं आणि तिथल्या निवडणुका धोक्यात आल्यात. मात्र, याबाबत अपिल करण्यासाठी १०आठवड्यांची मुदत हायकोर्टानं दिली आहे.

चंद्रपुरातील नगरसेवकाच्या बोगस प्रमाणपत्राची कहाणी

Last Updated: Sunday, January 15, 2012, 16:17

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर नगरपालिकेचा विद्यमान नगरसेवक नासीर खान यानं बोगस कागदपत्रांच्या आधारे स्वत:ची जात बदलून जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करत निवडणूक लढवल्यानं राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे