ठाण्यातल्या राजकारणात पोलीस पेचात!

Last Updated: Monday, January 6, 2014, 10:28

ठाणे महापालिका निवडणुकीनंतर ठाण्यातलं राजकीय वातावरण अक्षरश: ढवळून निघालंय. राजकारण्यांच्या एकमेकांना शह-काटशह देण्याच्या प्रयत्नात पोलिसांची मात्र चांगलीच गोची झालीय.

शहकाटशहात सेनेचा सरशी, मोकाशी ठाण्याच्या उपमहापौरपदी

Last Updated: Sunday, January 5, 2014, 08:56

ठाण्याच्या उपमहापौरपदी भाजपाच्या मुकेश मोकाशी यांची बिनविरोध निवड झालीय. मिलिंद पाटणकर यांना झालेल्या मारहाणीच्या प्रकारणात हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यानं आघाडीनं या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

ठाणे पालिका राडा, सेना-भाजपच्या ५ जणांना अटक

Last Updated: Thursday, December 26, 2013, 12:48

ठाण्यामधल्या उपमहापौर मिलिंद पाटणकर यांच्या केबिनच्या तोडफोडप्रकरणी शिवसेना आणि भाजपच्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

‘पक्षातल्याच लोकांनी गळा कापला’; मिलिंद पाटणकर ‘झी २४ तास’वर...

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 18:39

गेले दोन दिवस गायब असलेले ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर आज सर्वप्रथम `झी २४ तास`वर अवतरले. आपल्याला कुठलीही मारहाण झाली नसून चार दिवस विश्रांतीसाठी म्हणून आपण बाहेर फिरायला गेल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय.

ठाणे पालिकेत उपमहापौरांना चोपले, वरिष्ठांच्या भेटीनंतर नॉट रिचेबल

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 09:38

ठाणे महापालिकेत सत्ताधारी शिवसेनेला परिवहन समितीच्या निवडणुकीत युतीच्या पराभवाला कारण ठरलेले उपमहापौर मिलिंद पाटणकर कालपासून नॉट रिचेबल आहेत. काल रात्री शिवसेनेचे काही नेते आणि मिलिंद पाटणकरांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. दरम्यान, त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यामुळे पालिकेत राजकीय राडा पाहायला मिळाला.

नेताजी बोस यांची मुलगी बनली जर्मनीमध्ये उपमहापौर

Last Updated: Sunday, December 16, 2012, 16:59

जर्मनीच्या आउग्सबर्ग जिल्ह्यातील स्टटबर्ग या शहराच्या उपमहापौरपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची कन्या अनीता प्फाफ यांची निवड झाली आहे. अनीता या सत्तर वर्षांच्या असून त्या अर्थतज्ज्ञ आहेत. त्यांनी भारताला अनेक वेळा भेट दिली आहे. मात्र नेताजींशी त्यांची भेट कधीच झाली नव्हती.