मुख्यमंत्री मोदींच्या पगाराचं काय झालं?

Last Updated: Monday, May 26, 2014, 13:25

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून राजीनामा दिल्यानंतर आता नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून एक रुपयाही पगार घेत नव्हते. त्यांचा गेल्या १२ वर्षांचा पगार जमा झाला होता. त्यांनी हा पगार आपल्या चालक, रक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी भेट दिल्याचा मेसेज सध्या व्हॉट्सअपवर फिरत असून तो धुमाकूळ घालत आहे.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिरनं केलं मरणोत्तर अवयवदान

Last Updated: Monday, March 31, 2014, 14:01

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हा चित्रपटांव्यतिरिक्त सामाजिक कार्यातही तितकाच परफेक्ट असतो. नुकताच आमिरनं मरणोत्तर अवयवदान केलंय. शनिवारी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात आमिर हा निर्णय घेतला. आमिर खान सध्या त्याच्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमाद्वारे समाजात एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित त्यातलंच त्याचं हे एक पाऊल असेल.

सर्वात मोठा दानशूर फेसबुकचा मार्क झुकरबर्ग

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 11:19

फेसबुक श्री मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या श्रीमती सौ प्रिसिलिया चान हे २०१३ मधील सर्वात जास्त दान करणारे दानशूर अमेरिकन ठरले आहेत. झुकरबर्ग आणि चानने १०.८ कोटी रूपये एका सामाजिक संस्थेला देई केले आहेत. हे शेअर्स ६० अब्ज रूपये किमतीचे आहेत.

कोल्हापूरच्या महालक्ष्मीला ६५ तोळे सुवर्ण अलंकार दान

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 15:04

करवीर निवासीनी महालक्ष्मीला कर्नाटकातील भक्तांकडून ६५तोळे सोन्याचा हार आणि सोन्याचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे. मेकपाटी राजगोपाल रेड्डी, खासदार राजमोहन रेड्डी आणि आमदार चंद्रशेखर रेड्डी यांच्याकडून हार आणि मुकूट देवीला अर्पण करण्यात आला आहे. ६५तोळ्याच्या हाराची किंमत साधारणपणे २०लाख रुपये इतकी आहे.

भारतात गरज २२ लाख नेत्रदात्यांची!

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:47

साठ वर्षीय विठ्ठल बोराडे यांनी औरंगाबादहून आपल्या डोळ्यांवर उपचार करून घेण्यासाठी ते मुंबईतील जे.जे. हॉस्पीटल गाठलंय. लवकरच त्यांना दिसू लागणार आहे...

प्रियांका गांधी करणार अवयव दान

Last Updated: Thursday, December 6, 2012, 21:19

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी वढेरा यांनी बुधवारी अवयवदान करण्याची घोषणा केलीय. यावेळी मार्क्सावादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात यांच्यासह ५०० जणांनी आज अवयवदानाची शपथ घेतली.