Last Updated: Wednesday, March 28, 2012, 13:59
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांनी विधानसभेत अर्थ संकल्प सादर करतांना घरगुती गॅसच्या दरात 5 टक्के दरवाढ प्रस्तावीत केली...मात्र त्यानंतर विरोधकांसह सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस पक्षाने त्या दरवाढीचा विरोध केला..अर्थमंत्र्यांनी प्रस्तावीत केलेली घरगुती गॅसची दरवाढ अन्यायकार असल्याचं काँग्रेसने म्हटलं...घरगुती गॅस दरवाढीच्या निमित्ताने काँग्रेसने अजित पवारांना कोंडीत पक़डण्याचा प्रयत्न केला...