सिंधुदुर्गमध्ये मनाई आदेश जारी

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 15:06

कोकणात नारायण राणे विरुद्ध भास्कर जाधव यांच्यातल्या वादामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हमरीतुमरीवर आले असल्यानं पोलिसांनी सिंधुदुर्गात आंदोलन करण्यास मनाई केली. सिंधुदुर्गात राणेंना यापुढं जशास तसं उत्तर देऊ, असा आवाज राणेंच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीनं दिला, तर राणे समर्थकांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना नेहमीच्या स्टाईलमध्ये बजावलं.

जाधव-राणे यांची 'फोडाफोडी'

Last Updated: Monday, November 7, 2011, 12:55

राणे यांच्या ठोकशाहीचा भास्कर जाधवांना चांगलाच प्रत्यय आला आहे. राणे यांच्यावर टिका केल्यानंतर भास्कर जाधवांचे कार्यालय फोडण्यात आले. यानंतर या वादाला हिंसक वळण लागले. त्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेसुद्धा रस्त्यावर उतरले, आणि चिपळूणमध्ये मुंबई-गोवा महामार्ग रोखण्यात आला.