पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी!

Last Updated: Monday, October 7, 2013, 11:46

भारताच्या पृथ्वी-२ या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची ओडिशामधील चंडीपूर इथल्या तळावरून यशस्वी चाचणी करण्यात आलीय. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर हल्ला करणारं क्षेपणास्त्र असून ३५० किमीच्या पट्ट्यात ते मारा करू शकतं.

`अग्नी-५`ची दुसरी चाचणीही यशस्वी; चीनला धडकी

Last Updated: Sunday, September 15, 2013, 10:39

भारतानं आपल्या सर्वात शक्तीशाली मिसाईल म्हणजेच ‘अग्नी-५’ची दुसरी चाचणी यशस्वीपणे पार पाडलीय. ओडिसाच्या व्हिलर बेटावर ‘अग्नी-५’ या क्षेपणास्त्राचं यशस्वी परिक्षण पार पडलंय.

`पृथ्वी २` क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण

Last Updated: Thursday, December 20, 2012, 16:41

भारतानं गुरुवारी बालेश्वरपासून काही अंतरावर स्थित चांदीपूरमध्ये एका भारतीय बनावटीच्या या अण्विक शस्त्रास्त्र वाहक क्षमता असणाऱ्या क्षेपणास्त्राचं यशस्वी परीक्षण केलंय. या क्षेपणास्त्रच्या हल्ल्याची क्षमता ३५० किलोमीटर इतकी आहे.

१ मिनिटात उडवू अमेरिकेची दाणादाण

Last Updated: Thursday, July 5, 2012, 08:17

अमेरिकेने जर इराणवर हल्ला केला तर इराण इस्राइलसह मध्य पूर्वेतील अमेरिकेची ठिकाणं १ मिनिटात उध्वस्त करू अशी इराणने अमेरिकेला धमकीच दिली आहे. तेहरानमध्ये चालू असणारा अण्वस्त्र निर्मितीचा कार्यक्रम थांबवण्यासाठी चर्चेतून मार्ग न निघाल्यास इस्राइल इराणवर हल्ला करेल.

पाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:41

सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.

पाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 12:58

भारताने आपली ताकद दाखवून देताना नुकतीच क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. त्यानंतर चीनने आगपाखड केली. आता आपणही मागे नसल्याचा प्रयत्न पाकने केला आहे. पाकिस्तानने आज बुधवारी अण्वस्त्रधारी 'शाहिन-१ए' ( हत्फ-४) या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.

नाशिकमध्ये क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन

Last Updated: Tuesday, January 10, 2012, 16:36

नाशिकच्या देवळाली कॅम्प भागात अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचं प्रदर्शन अगदी थाटात पार पडलं. त्यातून भारतीय तोफ दलाची क्षमता दिसून आली. धाडसी कसरती सादर करत सैनिकांनी भारतीय लष्कर सक्षम असल्याचं सिद्ध केलं.

अग्निची चाचणी चीनसाठी धोक्याची घंटा

Last Updated: Sunday, December 18, 2011, 12:36

भारत फ्रेबुवारी महिन्यात अग्नि-V क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे त्याबद्दल चीनच्या सरकारी माध्यमांनी ही धोक्याची घंटा असल्याचं मत व्यक्त केलं आहे. चीनची महत्वाची अनेक शहरं या लांब पल्ल्याच्या संहारक क्षेपाणस्त्राच्या टप्प्यात येतील.