सचिन तेंडुलकरला `भारतरत्न` जाहीर!

Last Updated: Saturday, November 16, 2013, 17:44

सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर आता ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर’ होतोय. सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालाय. देशाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारा सचिन पहिला खेळाडू ठरलाय. सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणं ही खुद्द सचिन तेंडुलकर प्रमाणंच त्याच्या चाहत्यांसाठीही एक सरप्राईज गिफ्ट असल्याचं मानलं जातंय.

कसाबसंदर्भात शिवसेनेचं राष्ट्रपतींना पत्र

Last Updated: Thursday, September 6, 2012, 10:04

भारताच्या सुप्रीम कोर्टानेही अजमल कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यामुळे कसाबला फाशी होणार आहे. मात्र त्यासाठी सर्वांत आवश्यक गोष्ट म्हणजे राष्ट्रपतींची परवानगी. यासाठीच शिवसेनेने राष्ट्रपतींना पत्र पाठवलं आहे.

राष्ट्रपती प्रणवदा भ्रष्टाचारी - टीम अण्णा

Last Updated: Monday, July 23, 2012, 09:15

देशाचे नवनियुक्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप टीम अण्णांनी केला आहे. मुखर्जी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असून २५ जुलैला ते सर्वासमक्ष जाहीर करणार असल्याचं टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

एनडीएची बैठक निष्फळच

Last Updated: Sunday, June 17, 2012, 21:25

राष्ट्रपतीपदी प्रणव मुखर्जींची सर्वसंमतीनं निवड होणार की नाही याबाबतचं चित्र आजही स्पष्ट होऊ शकलं नाही. या निवडणुकीबाबत निर्णय घेण्यासाठी एनडीएनं बोलावलेली बैठक आज कोणताही निर्णय न होताच संपली.

कोण बनणार राष्ट्रपती?

Last Updated: Wednesday, May 2, 2012, 18:21

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवरुन राजकारण चांगलंच तापतंय. राष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वसहमतीनं व्हावी आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी म्हटलंय.

राष्ट्रपतींनी पुण्यातील जमीन केली परत

Last Updated: Friday, April 27, 2012, 20:10

राष्ट्रपती प्रतिभा पाटील निवृत्तीनंतर पुण्यात राहायला जाणार नाहीत. राष्ट्रपतींनी पुण्यातल्या बंगल्याची जागा परत केलीय. याबाबत त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून निर्णय कळवलाय.