सचिन तेंडुलकरला `भारतरत्न` जाहीर!BHARAT RATNA ANNOUNCED FOR SACHIN TENDULKAR

सचिन तेंडुलकरला `भारतरत्न` जाहीर!

सचिन तेंडुलकरला `भारतरत्न` जाहीर!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर आता ‘भारतरत्न सचिन तेंडुलकर’ होतोय. सचिनला ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालाय. देशाचा सर्वोच्च सन्मान मिळवणारा सचिन पहिला खेळाडू ठरलाय. सचिन तेंडुलकरला भारतरत्न देणं ही खुद्द सचिन तेंडुलकर प्रमाणंच त्याच्या चाहत्यांसाठीही एक सरप्राईज गिफ्ट असल्याचं मानलं जातंय.

आज सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला. संपूर्ण देश आज गहिवरला असतांना आता या आनंदाच्या बातमीनं सर्वांच्याच डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. राष्ट्रपती कार्यालयाकडून सचिनच्या ‘भारतरत्न’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली.

सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार द्यावा यासाठी अलीकडेच भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याबाबतच्या नियमात बदलही केले होते. त्यानंतर सचिन तेंडुलकरला भारतरत्न सन्मान देण्याचा मार्ग मोकळा झाला. सचिन तेंडुलकर क्रिकेटमधून निवृत्त झाला असतांना या दिवशीच त्याला ही अनोखी भेट भारत सरकारच्यावतीनं देण्यात आलीय.

दरम्यान, सचिननं आपल्या या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त करत `भारतरत्न` पुरस्कार त्याच्या आईला समर्पित केलाय. सचिन सोबतच रसायनशास्त्रातील अभ्यासक प्राध्यापक सी. एन. राव यांनाही ‘भारतरत्न’ जाहीर झालाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 16, 2013, 16:21


comments powered by Disqus