ट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, October 11, 2012, 13:18

मध्य रेल्वे मार्गावर चालत्या रेल्वेमधून चार जण खाली पडले. यापैंकी एकाचा मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सायन-माटुंगा रेल्वे मार्गावर ही दुर्दैवी घटना घडलीय.

मुंबई आणि उपनगरांमध्ये दमदार पाऊस

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 10:45

मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावलीय. रात्रिपासूनच पावसाची संततधार सुरू असल्य़ानं पश्चिम आणि पूर्व उपनगरांच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय.

पावसामुळे मुंबई मनपाचं पितळ उघडं

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 08:13

एका दिवसाच्या धुवाँधार पावसामुळे मुंबई महापालिकेचं पितळ उघडं पडलंय. या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. महापालिकेकडे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी नागरिकांनी केली.

पाऊस ओसरला, पण चाकरमान्यांचे हाल सुरूच

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 14:02

मुंबईत आता जरी पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तरीही समुद्रातील भरती-ओहोटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भरती येणार आहे. या वेळी लाटांची सरासरी उंची 4.01 मीटर असेल, तर ओहोटी रात्री 8:16 मिनिटांनी असेल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दरड कोसळ्यानं वाहतूक ठप्प झालीय.