अखेर दत्ता मेघेंचा काँग्रेसला राम-राम, भाजपच्या वाटेवर

Last Updated: Monday, June 9, 2014, 13:38

काँग्रेसचे नेते आणि वर्ध्याचे माजी खासदार दत्ता मेघे यांनी अखेर राजीनामा दिलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे आपण राजीनामा पाठवल्याचं दत्ता मेघे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं. दत्ता मेघे यांच्यासह समीर आणि सागर मेघे यांनी आपले राजीनामे दिलेत.

काँग्रेस `चार` मंत्र्यांना हटवणार की `दोन`?

Last Updated: Saturday, May 31, 2014, 16:09

काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे, ही परिस्थिती विधानसभा निवडणुकीत होऊ नये, म्हणून सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांना संघटनेच्या आणि जिल्हा बळकटीच्या कामाला लावण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आहे.

अपेक्षित यश न मिळ्याने राजीनामा - नितीश कुमार

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:28

बिहारमध्ये जनता दल युनाटेड पक्षाला लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे लोकसभेचा पराभव जिव्हारी लागल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पदाचा थेट राजीनामा दिला. नितीश यांनी राज्यपालांकडे आपला राजीनामा सोपल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

दबावानंतर न्या. गांगुली यांचा अखेर राजीनामा!

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 09:25

लॉ इंटर्न तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरून अडचणीत आलेले न्यायमूर्ती ए.के. गांगुली यांनी पश्चिम बंगाल मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदाचा अखेर राजीनामा दिलाय.

इन्फोसिसच्या संचालक मंडळातून व्ही. बालकृष्णन यांचा राजीनामा

Last Updated: Saturday, December 21, 2013, 09:27

देशातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसच्या संचालक मंडळातून व्ही. बालकृष्णन यांनी राजीनामा दिलाय. बालकृष्णन हे १९९१पासून इन्फोसिससोबत जोडलेले होते आणि कंपनीतील सध्याचे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. शिबूलाल यांच्या २०१५मध्ये होणाऱ्या निवृत्तीनंतर बालकृष्णन यांना कंपनीचे प्रमुख मानलं जात होतं.

दिल्लीत फेरबदल, सात मंत्र्यांचे राजीनामे

Last Updated: Saturday, October 27, 2012, 22:20

दिल्लीत मंत्रिमंडळ फेरबदलाच्या घडामोडींना वेग आलाय. फेरबदलाआधी मंत्र्यांचं राजीनामा सत्र सुरु आहे. सात मंत्र्यांनी दिलेले राजीनामे राष्ट्रपतींनी मंजूर केलेत. दरम्यान, रविवारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्रातूनही काही जणांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

राजीनामा दिला, अजितदादा म्हटले तरी काय?

Last Updated: Tuesday, September 25, 2012, 18:05

अजित पवार स्वच्छ आहे, लवकरच सिद्ध होईल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला राजीनामा.

मुंबई दंगल : आबा राजीनामा द्या- राज ठाकरे

Last Updated: Friday, August 17, 2012, 19:23

मुंबईतील हिंसाचार रोखण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील आणि पोलीस यंत्रणा पूर्णत: अपयशी ठरली आहे. आर आरना गृहखातं समजलेलच नाही. त्यामुळे पोलीस आयुक्त आणि आर आर यांच्या राजीनाम्यासाठी २१ रोजी मोर्चा काढणार आहोत, अशी माहिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.