`तेहलका`च्या शोमा चौधरीला पोलिसांची नोटीस

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 16:27

तेहलकाच्या व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी आणि इतर महत्त्वाच्या साक्षीदारांना आज गोवा पोलिसांनी नोटीस बजावली. तेहलका मासिकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांनी एका महिला पत्रकाराचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

अखेर तरुण तेजपाल तुरुंगात, गोवा पोलिसांनी केली अटक

Last Updated: Sunday, December 1, 2013, 12:00

तहलकाचे संपादक तरुण तेजपाल याला अखेर अटक झाली आहे. लैंगिक शोषणप्रकरणात तेजपालचा अटकपूर्व जामीन अर्ज, गोवा कोर्टानं फेटाळलाय. तेजपालला कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. गोवा पोलीस तेजपालसाठी १४ दिवासांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

तेजपालचा ४.३० वाजता फैसला, जेल की बेल?

Last Updated: Saturday, November 30, 2013, 14:49

आपल्याच कार्यालयातील एका महिला पत्रकाराचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेले तहलकाचे संस्थापक तरूण तेजपाल याच्यावर पणजी सत्र न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न झाला. लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तीवाद संपाला आहे. साडेचारनंतर कोर्टाची अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे.

तरुण तेजपालांची अटक उद्यापर्यंत टळली

Last Updated: Friday, November 29, 2013, 20:36

सहकारी तरुणीवरील लैंगिक शोषण प्रकरणी तहलकाचे तरुण तेजपाल यांना तात्पुरता दिलासा मिळालाय. तेजपाल यांच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी होणार आहे. तोपर्यंत तेजपाल यांची अटक टळलीय.

गोवा पोलिसांचे तरुण तेजपाल यांना समन्स

Last Updated: Wednesday, November 27, 2013, 11:39

सहकारी महिला पत्रकारावरील लैंगिक हल्ला आणि विनयभंग प्रकरणी गोवा पोलिसांनी तहलकाचे संपादक तरुण तेजपाल यांना समन्स पाठवलाय. आपली बाजू मांडण्यासाठी लवकरात लवकर गोव्यात हजर रहावे असे आदेश गोवा पोलीसांनी तरूण तेजपालांना दिलेत.

तहलका : `जे काही झालं ते सर्व काही मुलीच्या मर्जीनुसारच...’

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 17:29

सहकारी तरुणीच्या लैंगिक शोषण प्रकरणी ‘तहलका’चे ‘एडिटर इन चीफ’ तरुण तेजपाल यांना दिलासा मिळालेला नाही. त्यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावरील सुनावणी उद्यापर्यंत टळलीय

सेक्स स्कँडल : तेजपालचीही होणार चौकशी

Last Updated: Sunday, November 24, 2013, 16:12

लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालांवर फास आवळण्यास सुरूवात झालीय. गोवा पोलिसांच्या टीमने नवी दिल्लीत चौकशीला कालपासून सुरूवात केलीय. आज तरूण तेजपाल यांना चौकशीसाठी बोलावणं पाठवलं जाण्याची शक्यता आहे.