राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

Last Updated: Thursday, May 15, 2014, 08:58

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

महाराष्ट्र शासनात टायपिस्टची भरती

Last Updated: Thursday, January 9, 2014, 17:37

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयासाठी तसेच सर्व जिल्हा कार्यालयांसाठी लिपिक-टंकलेखक हे पद तत्वावर भरावयाचे आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख २०/०१/२०१४ राहिल.

राज्याच्या आरटीओ विभागात तब्बल २०८ जांगासाठी भरती

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 13:46

महाराष्ट्र शासन मोटार वाहन विभागात (आरटीओ) लिपिक आणि टंकलेखक पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. त्यानुसार तब्बल २०८ जागा भरण्यात येणार आहेत. प्रादेशिक परिवहन विभागांच्या आस्थापनेवरील गट ‘क’मधील लिपिक-टंकलेख या संवर्गातील रिक्त पदांच्या जागांसाठी सरळसेवा भरती करण्यात येणार आहे.

उत्पादन शुल्क विभागात लिपिक – टंकलेखक पदाची भरती

Last Updated: Thursday, October 24, 2013, 08:51

महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.