राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार, Maharashtra State recruitment, clerk & typist employment

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

राज्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लादण्यात आलेली सरकारी नोकरभरतीवरील बंदी अंशत: उठविण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि मुंबईतील शासकीय कार्यालयांतील 1300 लिपिक-टंकलेखकाच्या रिक्त जागा भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे तरुणांनी नोकरीचे अर्ज भरण्यासाठी कामाला लागा.

या आधीच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर 2008मध्ये राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार असल्याने नव्याने भरती करण्याचे धोरण थांबविण्यात आले होते. मात्र, यामध्ये आता लवचिक धोरण शासनाने स्वीकारल्याचे दिसत आहेत. त्यामुळे ही भरती करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

2010 ते 2012 या दोन वर्षात नोकरभरतीवर बंदी घालावी लागली. त्यानंतर विविध सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी याला विरोधात विरोध केला होता. कर्मचारी वर्ग कमी असल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांवर पडणारा कामाचा ताण आणि वाढणाऱ्या रिक्त जागा हा संघटनांच्या आंदोलनाचा प्रमुख विषय बनला. त्याचीही दखल सरकारला घ्यावी लागली आहे.तसेच तीन टक्क्यांची अट शिथिल करून शासनाच्या विविध विभागांतील 1300लिपिक-टंकलेखकाची रिक्त पदे भरण्यास मान्यता दिली. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 15, 2014, 08:57


comments powered by Disqus