भारतासह अनेक देशांमध्ये फोन होतायेत टॅप, वोडाफोननं केलं कबुल

Last Updated: Sunday, June 8, 2014, 14:21

प्रमुख दूरसंचार कंपनी वोडाफोननं स्वीकार केलंय, की सरकारी एजंन्सीज त्यांच्या नेटवर्कवर होणारं बोलणं (कॉल्स, मॅसेज आणि इ-मेल) वारंट शिवाय ऐकतात. कंपनीनं या सरकारी एजेंसिंना अशा गुप्त तारे लावण्याची परवानगी दिली. ज्यामुळं सर्व बोलणं ते ऐकू शकतात.

वीज दुरूस्तीचा भार आता महिलांवर

Last Updated: Thursday, October 17, 2013, 16:54

गावातली वीज गेली आणि दुरूस्तीसाठी वीज कंपनीने एखाद्या महिलेला पाठवले तर `शॉक` लागण्याचं काही कारण नाही. यापुढे वीज दुरूस्तीचा भार केवळ वायरमनच नव्हे, तर वायरवुमनही वाहणार आहेत. महावितरणनं राज्यात 2 हजार वायरवुमनची भरती केली असून त्यांना सध्या नाशिकच्या एकलहरे केंद्रात प्रशिक्षण दिलं जातंय.

हार्बर रेल्वे खोळंबली, पत्रे उडून ओव्हरहेड वायर तुटली

Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:40

ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रबाळे स्टेशनमध्ये छताचे पत्रे रेल्वे रुळांवर पडल्यानं ओव्हरहेड वायर तुटली आहे.

ओव्हरहेड वायरला चिटकून एकाचा मृत्यू; हार्बर रेल्वे विस्कळीत

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 10:55

हार्बर लाईनवर ओव्हरहेड वायरला चिटकून एका प्रवाशाचा मृत्यू झालाय. त्यामुळे रेल्वेची हार्बर लाईनवरची वाहतूक विस्कळीत झालीय.

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Monday, February 6, 2012, 08:58

पश्चिम रेल्वेच्या मरीन लाईन्स ओव्हर हेड वायर तुटल्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या फास्ट लोकल स्लो ट्रॅकवरून चालवण्यात येत आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील गाड्या अर्धा तास उशीराने धावत आहेत.

उघड्या डिपीमुळे कल्याणकरांच्या जीवाला धोका

Last Updated: Saturday, January 7, 2012, 17:45

कल्याण पुर्वेतील आहेत MSEB च्या उघड्या डिपीतून वायर्स उघड्या लटकत आहेत. ही दुरवस्था गेल्या कित्येक महिन्यांपासून अशीच आहे. कल्याण पुर्वेच्या अनेक भागात अशा उघड्या डिपी जागोजागी आहेत.