अबब..जगात फेसबुक, जीमेलचे २० लाख पासवर्ड चोरीला

Last Updated: Thursday, December 5, 2013, 20:17

तुमचे फेसबुक, जीमेलचे अकाऊंट आहे का? असेल तर सावधान. कारण तुमचं अकाऊंट हॅक होण्यापेक्षा सध्या पासवर्ड चोरीचा घटनांत वाढ झाली आहे. जगातील तब्बल २० लाख पासवर्ड चोरीला गेलेत. एवढ्यावर न राहता सायबर चाच्यांनी ते सर्वांसाठी इंटरनेटच्या माध्यमातून खुले करण्यात आलेत. हे वाचून धक्का बसला ना. मग तुमचे अकाऊंट सेफ आहे, असं तुम्ही म्हणू शकाल का?

अमेरिकेकडून याहू, गुगलचा डाटा होतोय हॅक...

Last Updated: Friday, November 1, 2013, 22:35

जगभरात इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या याहू आणि गुगल या कंपन्यांचा डाटा सध्या चोरला जातोय आणि ही चोरी केली जातेय ती चक्क अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेकडून...

तो १७ व्या वर्षी झाला करोडपती

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 16:29

ज्या वयात शिक्षण घ्यायचे त्या वयात एक १७ वर्षांचा तरूण एक, दोन, तीन नाही तर तब्बल ३२५ कोटींचा मालक झाला आहे. त्यांने १५ व्या वर्षी `समली` अॅप्लिकेशन बनविले. या अॅप्लिकेशनला चांगलाच भाव आलाय. त्याची किंमत ३२५ कोटी रूपयांच्या घरात आहे.

याहू रिलॉन्चिंगच्या तयारीत!

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 11:40

गुगल, ट्विटर आणि फेसबूकच्या गर्दीत तुम्हाला कधी याहू मेल आणि चॅटची आठवण झालीय का? नक्कीच तुमचं एखादं जुनं याहू अकाऊंट असू शकतं. पण, तुम्ही त्याकडे चुकून कधीतरी पाहत असाल... होय ना... याचीच जाणीव याहूला उशीरा का होईना पण झालीय.

गुगलची 'मेयर' म्हणतेय... 'याहूsss'

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 11:57

याहू आणि गुगल या इंटरनेट कंपन्यांमध्ये सुरू असलेलं शीतयुद्ध आता सगळ्यांनाच परिचित झालंय. एकमेकांना धोबीपछाड देण्यासाठी दोन्ही कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यातलाच एक भाग म्हणून ‘याहू’नं गुगलच्या मारिसा मेयर हिला आपल्या कंपनीत सामील करून घेतलंय.

सावधान, हॅक झालीत ४.५ लाख ई-मेल खाती!

Last Updated: Thursday, July 12, 2012, 21:01

याहू या सर्च इंजिन असलेल्या वेबसाइटवर ई-मेलचे खाते असणाऱ्यांनो सावधान कदाचित तुमचे खाते हॅक झाले असेल. हे खाते वापरणाऱ्या सुमारे साडेचार लाख जणांची माहिती आणि पासवर्ड हॅक केल्याचा दावा एका ऑनलाइन ग्रुपने केला आहे.

याहू आणि फेसबूकमध्ये पेटंट करार

Last Updated: Saturday, July 7, 2012, 20:45

गेल्या काही दिवसांपासून याहू आणि फेसबूकमध्ये ‘पेटंट’ उल्लंघनासंबंधीत सुरू असलेला खटला अखेर संपवण्याचा निर्णय या दोन्ही कंपन्यांनी घेतलाय. यासाठी त्यांनी पेटंटसंबंधी एक करार करण्याचा निर्णय घेतलाय.

आता लवकरच 'फेसबुक' नाहीसं होणार ?

Last Updated: Wednesday, June 6, 2012, 13:33

जग फेसबुकशिवाय राहू शकेल असे वाटते का? हो तर ते खरं आहे, काही वर्षातच फेसबुक गायब होणार आहे. काय धक्का बसला ना? पण येत्या चार-पाच वर्षात फेसबुक हे नाहिसे होणार आहे मत व्यक्त केलं आहे शेअर बाजारातील तज्ज्ञांनी.

गुगल, याहू, फेसबुकला केंद्राची सक्त ताकीद

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 07:33

गुगल, याहू, फेसबुक या साईट्सना केंद्र सरकारने फैलावर घेतले आहे. अक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र टाकण्यावर जोरदार हरकत घेतली आहे.