Last Updated: Tuesday, May 29, 2012, 08:58
देशभरात पेट्रोल दर वाढीला तीव्र विरोध होत आहे. करूणानिधी, ममता बॅनर्जीं यांनी कडाडून विरोध केला. तर गोव्यात मनोहर पर्रीकर यांचं सरकार आल्यावर पेट्रोलच्या किमती तब्बल ११ रुपयांनी कमी करण्यात आल्या.गोवेकरांनी हा आनंद एक महिनाही उपभोगला नाही तोवर केंद्र सरकारनं पेट्रोलच्या किमतीत मोठी वाढ करून आम जनतेला धक्का दिलाय.त्यामुळे देशासोबतच गोव्यातही या पेट्रोल दरवाढीचा तीव्र विरोध होत आहे.