सोने-चांदी दरात घसरण

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 13:03

सोने-चांदीच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून घसरण झाली आहे. मागणीत झालेली घट आणि साठेबाजांनी केलेल्या विक्रीने सोमवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात प्रति तोळा १७५ रुपयांची घट झाली. तर चांदीही २८० रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, सोनेचा प्रति तोळा २७४१४.२ ते २८,३४५ रूपये दरम्यान दर आहे.

सोने, चांदी दरात घट, जागतिक मंदीचा परिणाम

Last Updated: Thursday, November 28, 2013, 10:22

सोन्याचा भाव १४०० रूपयांनी कमी झाल्याने सोने प्रति तोळा ३०,००० रूपये झाले आहे. जागतिक मंदीचा सोने दरावर परिणाम दिसून येत आहे. तर राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात बुधवारी मरगळ दिसून आली. सोने ३१,४२५ रुपये तोळा झाले.

सोने-चांदीच्या दरात तेजीनंतर घसरण

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 13:08

सलग दोन दिवस तेजीत असलेला सोन्याचा भाव मंगळवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात ३४० रूपयांच्या घसरनीसह ३१ हजार ६२५ रूपये प्रति तोळा होता. सोन्याबरोबरच चांदीचा भाव ३४० रूपयांनी कमी होऊन तो प्रति किलो ४९ हजार १० हजार रूपयांवर बंद झाला. तर मुंबईत सोमवारी सोन्याच्या किंमतीत घसरण झालेली पाहायला मिळाली. प्रति तोळा २९,७३७ रूपये होता.

सोने-चांदीचा काय आहे दर?

Last Updated: Monday, April 22, 2013, 14:47

गेल्या आठवड्याच्या मध्यात सोन्याच्या किमतीत कमालीची घट झाल्याने सोने खरेदीला रांगा लागल्या होत्या. मात्र, दोन दिवसानंतर सोने दरात थोडी वाढ झाली आहे. दिल्लीत सोने २७,००० हजार तर मुंबईत २६,३९५ हजार रूपये प्रति तोळा दर आहे. शहरानुसार काय आहे सोने-चांदीचा दर?

सोन्याच्या दरात घट, शहरानुसार सोन्याचा दर

Last Updated: Monday, April 15, 2013, 19:04

सोने खरेदी करणा-या इच्छुकांसाठी खुशखबर. सोन्याच्या किंमतीत आणखीन घट झालीये. सोनं प्रतितोळा २८ हजार ३०० रुपयांवर आलयं. देशभरात प्रमुख शहरांमध्ये काय आहे सोन्याचा दर.