पोलीस ठाण्यातच तरुणावर पोलीस निरीक्षकाचा लैंगिक अत्याचार ?

Last Updated: Friday, January 24, 2014, 15:39

मुंबईमधील चुनाभट्टीमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पोलीस ठाण्यात घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एका पोलीस निरीक्षकाने एका तरुणाचे लैंगिक शोषण केले. हे सर्व करण्यासाठी या पोलीस निरीक्षकाने महिलेचा वेष परीधान केला होता. या छळाप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलाय.

सोमय्या हॉस्पीटलची लिफ्ट कोसळली

Last Updated: Thursday, December 12, 2013, 21:23

सायन-चुनाभट्टी इथं असलेल्या के.जे सोमय्या हॉस्पिटलमध्ये आज लिफ्ट कोसळली. मात्र, सुदैवानं या अपघातात जीवितहानी झाली नाही.

भय इथले संपत नाही! जीव मुठीत घेऊन जगणं सुरू

Last Updated: Friday, November 22, 2013, 10:27

चुनाभट्टीतील स्वदेशी मिलच्या जागेचा वाद कोर्टात सुरु आहे. परंतु या वादाचा फटका मिलच्या जागेत राहणाऱ्या गिरणी कामगारांना बसतोय. लिक्विडेटरच्या ताब्यात मिल असल्यानं इथल्या निवासी इमारतीची ना दुरुस्ती होतंय ना पुनर्विकास. तीन मजली इमारत कधीही कोसळण्याच्या अवस्थेत असून पाचशेहून अधिक जणांचे प्राण धोक्यात आलेत.

चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 18:24

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.