चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 18:24

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

नाशिकमध्ये करोडोंचे जमीन घोटाळे

Last Updated: Thursday, September 13, 2012, 17:24

नाशिक शहरात शेकडो कोटी रुपयांचे जमीन घोटाळे उघडकीस येत असतांनाच महापालिकेबरोबरच हजारो नागरिकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. महापालिकेनं संपादित केलेली जमीन छोटे प्लॉट करून नागरिकांना विकून मूळ मालकांनी कोट्यवधींची माया गोळा केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

पवारांच्या घरात आणखी एक जमीन घोटाळा

Last Updated: Thursday, May 24, 2012, 14:50

महार वतनाची जमीन बळकावल्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वहिनी शर्मिला पवार यांच्याविरोधात पुण्यातल्या पौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हाधिका-यांची बनावट ऑर्डर तयार करुन ही जमीन बळकावल्याचा आरोप शर्मिला यांच्यावर आहे.

नवा जमीन घोटाळा, पुन्हा पवारांचाच गोतावळा!

Last Updated: Friday, May 4, 2012, 19:18

केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या कुटुंबियांवर पुन्हा एकदा जमिनीच्या गैरव्यवहाराचा आरोप होतोय. जिल्हाधिका-यांचा बनावट आदेश तयार करून महार वतनाची जमीन लाटल्याचा आरोप शर्मिला पवार यांच्यावर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या शर्मिला पवार या पत्नी आहेत.

खा. सुप्रिया सुळे अडचणीत

Last Updated: Friday, February 3, 2012, 08:27

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा या गैरव्यवहारात सहभाग असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते रवी ब-हाटे यांनी केलाय. सुप्रिया सुळे यांनी हे आरोप फेटाळलेत. तसेच सुळे यांच्या सिंगापूरच्या नागरिकत्वाविषयी याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. कागदपत्रांचा शोध घेण्यासंदर्भात न्यायालयानं सिंगापूरच्या दूतावासाला विनंती पत्र पाठवलं आहे. त्यामुळे सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे.

सावधान... नाशकात जमीन खरेदी करताय!

Last Updated: Wednesday, December 28, 2011, 12:56

नाशिकमध्ये बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं जमीन विक्री करणा-यांचा सुळसुळाट झालाय. महिनाभरात जमीन व्यवहारात फसवणुकीची पन्नास प्रकरणं समोर आली आहेत.

झी २४ तासच्या दणक्याने जमीन घोटाळा उघडकीस

Last Updated: Saturday, October 29, 2011, 10:48

उस्मानाबाद जिल्ह्यातील स्वाभिमान सबलीकरण योजनेत झालेल्या घोटाळ्याचा झी २४ तासनं पदार्फाश केला आहे. घोटाळा उघ़डकीस आणल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबड़ून जागं झालं. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन घोटाळ्याच्य़ा चौकशीसाठी समिती नेमली आहे.