मुंडे पुन्हा रुसले, पण यावेळी रिक्षात बसले!

Last Updated: Sunday, April 20, 2014, 16:13

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात मुक्कामी असलेले भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांना विमानतळाकडे घेऊन जाण्यासाठी नियोजित वेळी वाहन न आल्यानं मुंडे यांचा पारा चांगलाच चढला. संतापाच्या भरात ते हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या रिक्षात बसून थेट विमानतळाकडे रवाना झाले.

निवडणुकीची रणधुमाळी: लक्ष्मण जगतापांचा `वासुदेव` प्रचार!

Last Updated: Monday, April 7, 2014, 21:47

निवडणूक प्रचारात अनोखे फंडे वापरुन मतदारांपर्यंत पोहचण्याची शक्कल उमेदवार लढवतात. असाच एक प्रयोग मावळ लोकसभेचे शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सुरु केलाय.

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका

Last Updated: Friday, April 4, 2014, 12:30

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा विदर्भात एल्गार तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.

'तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी माझी स्वप्न चिरडून टाकीन'

Last Updated: Thursday, September 12, 2013, 09:02

राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यातील सलम्बरमध्ये आदिवासी शेतमजूरांच्या सभेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी राज्यातील काँग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा बिगुल फुंकलाय.

मिशन २०१४ - पंजाबमध्ये नरेंद्र मोदी करणार शंखनाद

Last Updated: Sunday, June 23, 2013, 12:33

भाजपाचे निवडणूक प्रचार प्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची आज पंजाबमधल्या माधोपूरमध्ये जाहीर सभा होणार आहे.

भ्रष्टाचारात भाजपचा विश्वचषक - राहुल गांधी

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 20:00

कर्नाटकातल्या भाजप सरकारनं भ्रष्टाचारात विश्वचषक जिंकला असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलाय.

कोकणात प्रचाराचं रणशिंग

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 14:32

रत्नागिरी नगर परिषदेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारालाही शिवसेनेनं रत्नागिरीतून सुरूवात केली आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पामुळे चर्चेत आलेल्या नाटेगावातून शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रचाराचं रणशिंग फुंकलं.

मनसेच्या मिळून साऱ्याजणी प्रचारात

Last Updated: Saturday, December 24, 2011, 16:05

नाशिकच्या इंदिरानगरमध्ये आता पासूनच प्रचाराला सुरूवात झालीय. त्या वॉर्डातून मनसेच्या तिकीटासाठी सात महिला उमेदवार इच्छुक आहेत. तसंच त्यांनी दिलेल्या परीक्षेचा निकालही अजून लागलेला नाही. मात्र तिकीट वाटपाची वाट न पाहता त्या सातही इच्छुक उमेदवारांनी एकत्रितपणे प्रचाराला सुरवात केलीय.