किरण ठाकूरांचा खेद, माफी मागण्यास नकार

Last Updated: Monday, July 30, 2012, 22:20

बेळगाव तरुण भारतचे संपादक किरण ठाकूर यांच्याविरोधात कर्नाटक विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. याप्रकरणी विधिमंडळात उपस्थित राहून किरण ठाकूर यांनी खेद व्यक्त केला परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला.

राज यांचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे- उद्धव

Last Updated: Thursday, December 22, 2011, 20:05

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरेंचे विधान म्हणजे ब्रह्म वाक्य नव्हे. शिवसेना सीमावासियांना वाऱ्यावर सोडणार नाही. राज यांची भूमिका म्हणजे सीमावासियांची क्रूर थट्टा असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. सीमावासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली तेंव्हा मराठी माणसाला मान सन्मान मिळत असेल तर कर्नाटकात राहयला काय हरकत आहे असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं होते.

बेळगाव महानगरपालिका बरखास्त

Last Updated: Thursday, December 15, 2011, 13:50

कर्नाटक सरकारनं बेळगाव महानगरपालिका बरखास्त केली आहे. मराठी भाषकांच्या ताब्यात असलेली महापालिका बरखास्तीचा आदेश कर्नाटक सरकारनं दिल्यानं मराठी भाषकांत संतापाची लाट उसळलीय.

बेळगावच्या महापौरांचा मराठी बाणा

Last Updated: Sunday, November 6, 2011, 17:45

कर्नाटक सरकारची बेळगाव महापालिकेवर वक्रदृष्टी पडली. बेळगावच्या महापौर मंदा बाळेकुंद्री आणि उपमहापौर रेणू किल्लेदार यांना कर्नाटक सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली. काळ्या दिनाच्या कार्यक्रमात सहभागी प्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे.