`झी २४ तास`चा दणका... रिक्षा दरात कपात

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 10:30

डोंबिवलीतली रिक्षा भाडेवाढ मागे घेण्यात आलीय. रिक्षा संघटनांच्या बैठकीनंतर हा निर्णय झालाय. १ ते १५ रुपयांपर्यंतची दरवाढ मागे घेण्यात आलीय. ‘झी २४ तास’नं या दरवाढी संदर्भातली बातमी दाखवली होती. त्यानंतर बैठक घेऊन ही दरवाढ मागे घेण्यात आलीय.

नाशिकमध्ये रिक्षाप्रवास महागला

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 00:14

नाशिककरांचा रिक्षाप्रवास आता आणखी महागलाय. नाशिकमध्ये रिक्षाभाड्यात तब्बल पंचवीस टक्क्यांनी वाढ झालीय. नाशिककरांना पहिल्या टप्प्यासाठी म्हणजे किमान भाड्यापोटी 15 रुपये मोजावे लागणार आहेत.

रिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप

Last Updated: Monday, April 16, 2012, 16:21

रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे.

नवी मुंबईत रिक्षाचालकांचा संप मागे

Last Updated: Friday, March 23, 2012, 18:18

नववर्षाच्या सुरुवातीलाच नवी मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेला रिक्षाचालकांचा संप अखेर मिटला आहे.

नवी मुंबईत ११ रूपये रिक्षा मीटर

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 11:07

नवी मुंबईकरांना रिक्षाचा प्रवास दिलासादायक होणार आहे. नवी मुंबईत किमान रिक्षाचे भाडे आता ११ रूपये असणार आहे. पूर्वी हे भाडे १५ रूपये होते. ११ रूपयांची अंमलबजावणी रविवारी दि. १८पासून मध्यरात्री होणार आहे.

मुजोर रिक्षाचालकांचा संप कायम

Last Updated: Saturday, March 3, 2012, 18:17

मीरारोडमध्ये मुजोर रिक्षाचालकांनी सलग चौथ्या दिवशीही बंद पुकारला आहे.आरटीओनं रिक्षा प्रवासी वाहतूकीचं नविन दरपत्रक जारी केलं होतं. मात्र हे दरपत्रक मान्य नसल्यानं कोणतीही पूर्वसुचना न देता रिक्षाचालकांनी बंद पुकारला.

राज्यातील रिक्षाचालकांची मुजोरी कायम

Last Updated: Friday, March 2, 2012, 08:16

महाराष्ट्र राज्यात बुधवारपासून डिजीटल मीटरची सक्ती करण्यात आली असली, तरी अनेक शहरांमध्ये मीटरप्रमाणं भाडे आकारणी होत नाही. त्यामुळे संतापाचे वातावरण आहे. मुंबईतील मीरारोड आणि नाशिकमध्ये तर मनमानी पद्धतीनं भाडे आकारणी सुरू आहे. तीन आसनी शेअर रिक्षांमध्ये सहा ते सात जणांना कोंबून परिवहन विभागाच्या आशीर्वादानं नाशिककरांची गळचेपी सुरू आहे. रत्नागिरी शहरातही रिक्षाचालकांची मुजोरी दिसून येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट चालली आहे.

पेट्रोल भडक्याने पुण्यात रिक्षा भाडेवाड

Last Updated: Wednesday, November 2, 2011, 02:24

पुणे शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना रिक्षा भाडेवाढीचा ‘चटका' बसणार आहे. या दरवाढीमुळे रिक्षासाठी नागरिकांना आता पहिल्या किलोमीटरसाठी पूर्वीप्रमाणे ११, तर पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी नऊऐवजी दहा रुपये मोजावे लागणार आहेत.