किंगफिशरचे कर्मचारी उपाशी, मल्ल्या पितापुत्रांची अय्याशी

Last Updated: Monday, October 22, 2012, 15:16

सरकारनं विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सचे पंख छाटले खरे मात्र याचा मल्ल्या परिवारावर काहीही फरक पडलेला नाही. किंगफिशर एअरलाईन्समध्ये काम करणा-या हजारो कर्मचा-यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालाय. मल्ल्या पिता-पुत्र मात्र परदेशात 2013 च्या दिनदर्शिकेसाठी नव्या दमाच्या मदनिकांच्या निवडीसाठी परदेशात आहेत.

किंगफिशर एअरलाईन्सला दणका

Last Updated: Saturday, October 20, 2012, 16:04

कर्जाच्या खाहीत लोटलेल्या आणि कर्मचाऱ्यांचे पगार थकविलेल्या किंगफिशर एअरलाईन्सला मोठा दणका मिळाला आहे. किंगफिशरचा नागरी हवाई परवाना रद्द करण्याचा निर्णय आज शनिवारी नागरी उड्डाण महासंचालकांनी घेतला आहे.

किंग ऑफ `बॅड` टाइम्स

Last Updated: Saturday, October 6, 2012, 18:05

किंगफिशरच्या सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. सध्याच्या घडीला किंगफिशर एअरलाईन्सच्या नुकसानाचा आकडा तब्बल 8 हजार कोटी इतका आहे. तर विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा बोजा 7 हजार कोटींचा आहे. किंगफिशरच्या ताफ्यात असलेल्या 63 विमानांपैकी आता फक्त दहाच विमानं उरली आहेत.

'किंग' मल्ल्या दिवाळखोरीत, घरांचा लिलाव

Last Updated: Thursday, July 5, 2012, 18:39

किंगफिशरचे सर्वेसर्वा विजय मल्‍ल्‍यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. एअरलाईन्सचे किंग म्हणून ओळखलेले जाणारे मल्ल्या दिवाळखोरीत आलेत. हे संकट एअरलाईन्समुळे ओढवले आहे. दिवाळखोरीतून बाहेर पडण्यासाठी मल्ल्यांना चक्क घरांचा लिलाव करावा लागण्याची वेळ आली आहे.