सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात ‘मगर’!

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 13:49

सोलापुरच्या रेवण-सिद्धेश्वर भागात सध्या दहशतीचं वातावरण आहे. कारण तिथं वावर आहे मगरीचा... सोलापूर महानगर पालिकेच्या उद्यान विभागाचा गलथान कारभार समोर आलाय. उद्यान विभागाच्या वन्य प्राणी विभागातून दोन वर्षांपूर्वी मगरीची पिल्ले बाहेर गेल्याची माहितीच पालिकेच्या उद्यान विभागाला नाही. नागरिकांचा वावर असलेल्या परिसरात मोकाट फिरणाऱ्या मगरीला तब्बल अडीच वर्ष झाली तरीही उद्यान विभागाला याचा पत्ताच लागलेला नाही.

माउलींची पालखी सोलापुरात दाखल

Last Updated: Sunday, June 24, 2012, 14:55

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं फलटणहून विडणी, पिंपरद, निंबळक फाट्यावरून प्रवास करत काल बरडला मुक्काम केला होता. आज माउलींची पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पालखीचा आजचा मुक्काम नातेपुते इथं असणार आहे.

भीमानदीत अवैध वाळू उपसा

Last Updated: Friday, June 1, 2012, 20:38

सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळूचे १० ते १२ ट्रक गावक-यांनी अडवले. मोहोळ तालुक्यातल्या अर्धनारी गावातल्या गावक-यांनी ही कारवाई केली आहे.