मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!, australian solution for water problem of marathwa

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

www.24taas.com, झी मीडिया, औरंगाबाद

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

या समन्यायी वाटपासाठी कांगारूंची मदत घेतली जाणार आहे. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथवेल्स या राज्याशी यासंदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या उपस्थितीत आज (गुरुवारी) करार होणार आहे. जायकवाडीचा तिढा सोडविण्यासाठी तंत्रज्ञान व माहितीच्या देवाणघेवाणीचे करार त्यात होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून समन्यायी पद्धतीने पाणी वितरणाची मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. पाण्याच्या न्याय्य हक्कासाठी न्यायालयातही याचिका दाखल झाल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर पाण्याचे वाटप कसे असावे? पाण्याची हक्कदारी कशी असावी? याचा अभ्यासही केला जात आहे.

‘न्यू साऊथवेल्स’ भागातही पाण्याचा प्रश्न गोदावरी खोऱ्याप्रमाणेच होता. काही भागांत अधिक पाऊस, तर काही ठिकाणी दुष्काळ अशी परिस्थिती तेथेही असायची. त्यामुळेच जायकवाडी धरणातील पाणीवाटपाचा प्रश्न सोडवण्यासाठी ‘न्यू साऊथवेल्स’ची समन्यायी पाणीवाटपाची पद्धत येथेही राबवता येईल काय? याची चाचपणी करण्यासाठी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ नुकतेच ऑस्ट्रेलियात जाऊन आले. जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर व जल-भूमी व्यवस्थापन संस्थेचे (वाल्मी) महासंचालक हि. ता. मेंढेगिरी यांनी तेथील पाणी वितरणाचा अभ्यास केला. त्यानंतर तंत्रज्ञान पातळीवर त्याचे प्रारूपही जलसंपदा विभागाने तयार केले.

तत्पूर्वी, औरंगाबाद येथे ऑस्ट्रेलियातील रॉबर्ट कार्ट यांनी भेट देऊन पाणी व्यवस्थापनाबाबत सादरीकरण केले होते. आता पाणीवाटपासंदर्भातील या करारावर गुरुवारी मुख्यमंत्री चव्हाण व `न्यू साऊथवेल्स`चे अध्यक्ष बॅरिओफरेल यांची स्वाक्षरी होणार आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, December 5, 2013, 10:12


comments powered by Disqus