राज ठाकरेंचा पवार काका-पुतण्यांवर पलटवार Raj Thackeray on Pawar uncle-nefew

राज ठाकरेंचा पवार काका-पुतण्यांवर पलटवार

राज ठाकरेंचा पवार  काका-पुतण्यांवर पलटवार
www.24taas.com, लातूर

राज ठाकरे आणि पवार काका-पुतण्यांमधील शाब्दीक लढाई थांबण्याचं नाव घेत नाही. सोलापुरातल्या सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांवर तोफ डागल्यानंतर काल अजित पवारांनी पलटवार राजवर जोरदार टीका करत पलटवार केला.

शरद पवारांनीही साता-यात राज ठाकरे हे लहान आहेत. त्यांच्या पोरकट प्रश्नांना उत्तरं द्यायची गरज नाही असं सांगत राज यांनी केलेल्या टीकेवर भाष्य करायचं टाळलं. त्यावर आज लातूरमध्ये असलेल्या राज ठाकरेंनी पत्रकारांशी औपचारीक गप्पांमध्ये पवार-काका पुतण्यांना लक्ष केलं. शरद पवारांना खालचे सगळेच पोरकट दिसतात. उलट त्यांना मनातून जास्त आनंद झाला असेल, म्हणूनच त्यांनी प्रतिक्रिया दिलेली नाही, असा त्यांनी लगावला. तसंच अजित पवारांचा चष्माचा नंबर वाढलेला दिसतोय. नाशिकच्या विकासाबद्दल 5 वर्षानंतर विचारा. असा सल्ला त्यांनी अजित पवारांना दिला.

यावेळी त्यांनी पत्रकारांना आपले कॅमेरे बंद करण्यास सांगितले. तसंच माझ्याशी युक्तिवाद न करता केवळ प्रश्न विचारण्याचं काम करा. असा आपल्या ठाकरी भाषेत दमही दिला.

First Published: Sunday, February 24, 2013, 18:11


comments powered by Disqus