Last Updated: Monday, February 18, 2013, 23:00
www.24taas.com, मुंबईराज ठाकरे उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देणार का याबद्दल सर्व महाराष्ट्राला उत्कंठा असतानाच राज ठाकरेंनी शिवसेनेला ‘खो’ दिला. याबद्दल उद्धव ठाकरेंना विचारलं असता योग्य वेळ आल्यावर बोलू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्यापुढं एकत्र येण्याचा प्रस्ताव ठेवल्यानंतर राज ठाकरेंनी कोल्हापुरच्या सभेत या प्रस्तावाची खिल्ली उडवली होती. असल्या चर्चा मेळावे घेऊन करायच्या नसतात असा टोलाही लगावला. याबाबत उद्धव ठाकरेंना विचारला असता ही काय टेबल टेनिसची मॅच नाही, मी योग्यवेळी बोलेनं. असा सूचक इशारा दिलाय.
उद्धव ठाकरेंच्या प्रस्तावाला राजनी थेटपणे धुडकावून लावलेलं नाही. त्यामुळं अजूनही या दोन भावांमधील एकत्र येण्याचा मार्ग बंद झालेला नाही.
First Published: Monday, February 18, 2013, 23:00