Last Updated: Saturday, February 23, 2013, 20:19
www.24taas.com, वाशिममहाराष्ट्रातील राजकारणात सध्या टीका, हल्ले आणि प्रतिहल्ले सुरू आहेत. काल सोलापूरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेला आज अजित पवार यांनीही उत्तर दिलं आहे. मी माझ्या काकांमुळे मोठा झालो. तर तू तुझ्या काकांमुळे मोठा झाला.. असं म्हणत राज ठाकरे यांना अजित पवारांनी चांगलाच टोला हाणला... मी कुठं म्हणलं, तुझ्या काकामुळे किंमत आहे, मला माहिते माझ्या काकामुळे मला किमंत आहे, तुला तरी कोणी विचारलं असतं का?
कालच्या सभेत राज यांनी अत्यंत कडव्या भाषेत अजित पवारांवर टीका केली होती. त्यावर अजित पवारांनी आज पलटवार केला. मी काकांच्या जीवावर मोठा झालो हे मला मान्यच आहे. पण राजही त्यांच्याच काकामुळे मोठे झालेत, असा टोला अजितदादांनी लगावला.
कादाचित मी पण आता शिवराळ भाषा वापरू शकतो, मी तर प. महाराष्ट्रातला आहे, तुम्ही म्हणाल काय शिव्या हासडल्या, पण त्याने तुमची रात्रीची चूल पेटणार आहे का? असं म्हणत राज ठाकरेंच्या शिवराळ भाषेचा समाचार घेतला. फक्त शिव्या देऊन कामं होत नसतात, असं म्हणत त्यांनी नाशिक मध्ये काय गोदावरीची काय वाट लागली आहे, असं म्हणत मनसेच्या नाशिक महानगरपालिका कार्यपद्धतीवरही त्यांनी टीका केली आहे.
First Published: Saturday, February 23, 2013, 20:19