सरकारची उदासीनता लज्जास्पद?

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 11:44

अर्जुन डांगळे, (आरपीआय आठवले गट)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आंदोलन करावं लागतं ही एक शरमेची आणि खेदजनक गोष्ट आहे. यासाठी केवळ आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आहे, याची पण खंत वाटत आहे. बाबासाहेब केवळ दलित जनतेचे नाही ते सर्व भारताचे आहेत. त्यांच्यासाठी रिपाइं किंवा आंबेडकर चळवळीच्या लोकांनी आंदोलन करावे आणि इतरांनी गंमत पाहावी ही गोष्ट मनाला पटत नाही.

‘करून दाखवलं’

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 18:37

राहुल शेवाळे
उद्धवजींच्या संकल्पनेतून वचननामा सिद्ध केला गेला. त्या वचननाम्यातून आम्ही जनतेला जी कामं करण्याचं वचन दिलं होतं, ती सर्व कामं आम्ही करून दाखवली आहेत. आणि या सर्वाची माहिती लोकांना व्हावी यासाठी करून दाखवलं, हे कॅम्पेन आम्ही चालवलंय.

विकास कामे प्रशासनाने केली आहेत...

Last Updated: Monday, December 19, 2011, 13:27

नियाज वणू
मुंबई महापालिकेतील विकास कामांचे कोणत्याही एका पक्षाने श्रेय घेणं योग्य नाही. कारण या सर्व मोठ्या प्रकल्पांचे निर्णय प्रशासन घेत असतं. महापालिकेची एकही काम शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी प्रस्तावित केलेलं नाही तर ते महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित केलेलं आहे

पेडर रोडसाठी आम्ही बेडर.....

Last Updated: Friday, December 9, 2011, 10:28

नितीन सरदेसाई
पेडर रोड उड्डाणपूल.. हा विषय गेली दिवस चांगलाच गाजतो आहे.... मनसेची भूमिका याआधी ही स्पष्ट केली होती.. हा उड्डाणपूल झालाच पाहिजे. आणि यापुढेही तीच मागणी आम्ही लावून धरणार आहोत.

मोटारगाड्यांनी व्यापली मुंबापूरी

Last Updated: Thursday, December 8, 2011, 16:41

अशोक दातार
देशात वाहतुकीचे धोरण निश्चित करताना ते कार केंद्रीत आहे. आज जगभरातील देश अधिकाअधिक लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा यावर भर देतात. त्यासाठी बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमला (बीआरटी) प्राधान्यक्रम देतात. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि चीनमध्ये तर ७९ शहरांमध्ये वाहतुकीसाठी ही व्यवस्था अवलंबण्यात आली आहे. रेल्वे प्रमाणे बसचा विचार करा असं सूत्र त्यामागे आहे.

सोशल नेटवर्किंग नव्हे... 'नॉटवर्किंग'

Last Updated: Thursday, December 8, 2011, 12:54

सचिन सावंत
इंटरनेट आलं त्यांनी जगाचा चेहरामोहराच बदलून टाकला, क्षणार्धात एका ठिकाणाची बातमी दुसऱ्या ठिकाणी यासारख्या गोष्टी सहजपणे होऊ लागल्या. भारतात या सोशल मीडियावर काहीही बंधने नाहीत मात्र आक्षेपार्ह मजकूरावर बंधने आली पाहिजेत.

FDIमुळे बाजार उठणार का?

Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:00

मॉल्स, सुपरमार्केट्समुळे यापूर्वीच स्थानिक व्यापारांच्या उद्योगांवर परिणाम झाला आहे. पण, ते सर्वसामान्य लोकांना मोठ्या प्रमाणावर जाणवलं नाही. पण, यापुढच्या काळात खूप मोठी समस्या निर्माण हऊ शकते. सरकार काही मुद्द्यांचं विश्लेषण करत नाहीये. त्यांचा विचार करायलाच हवा.

रिटेलमधील गुंतवणुकीचे स्वागत करायला पाहिजे

Last Updated: Monday, November 28, 2011, 16:24

भारतात थेट परदेशी गुंतवणूक वाढायला पाहिजे असं माझं मत आहे. आज चीनमध्ये 60 दशलक्ष डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली आहे. त्या तुलनेत भारतात फक्त चार दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. जगाच्या एकूण गुंतवणुकी पैकी फक्त तीन ते चार टक्केच गुंतवणूक भारतात करण्यात येते. देशात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक झाली तर व्यापाराला चालना मिळेल.

'हा मराठी माणसाचा अपमान'- सरनाईक

Last Updated: Friday, November 25, 2011, 18:09

शरद पवार म्हणाले की माझे राजकीय वैर असू शकतं पण चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत माझे कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा निषेध होतो. शिवसेनाप्रमुखांनीही पहिल्यांदाच बाहेर येऊन स्पष्ट शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचा अपमान होणारी घटना दिल्लीत घडली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहे. महाराष्ट्राला जेंव्हा मदतीची गरज भासते तेंव्हा दिल्लीत राज्याच्या समस्या सोडवणारे पवार हे एकमेव नेते आहेत.

राहुल गांधींचे वक्तव्य दु:खद, अपमानास्पद- अभिराम सिंह

Last Updated: Wednesday, June 20, 2012, 08:09

राहुल गांधींकडे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून पाहण्यात येतं. नेहरु गांधी घराण्याने या देशावर जवळपास चाळीस वर्षे राज्य केलं त्याचा वारसा राहुल गांधी पुढे चालवत आहेत. पण उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी मुंबई-महाराष्ट्रातील उत्तर भारतीयांबद्दल केलेलं वक्तव्य चूकीचे आहे. राहुल गांधींनी केलेले हे वक्तव्य हिंदी भाषिकांसाठी अपमानास्पद आहे पण त्यांनी हे जाणून बूजून केलं नसावं असं माझं मत आहे. तरीही त्यांनी केलेला शब्दप्रयोग अतिशय दुखद आहे.