'काँग्रेस हा गेंड्याच्या कातडीचा पक्ष'

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 12:03

अतुल भातखळकर
काँग्रेस या पक्षाने देशाचे कधीच भलं तर केलं नाहीच पण तसा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना देखील सोयीस्कररित्या बाजूला केलं. गेंड्याची कातडी असलेला आणि ज्याच्यामुळे देशाला किड लागली आहे असा हा पक्ष आहे. काँग्रेसने सत्तेत अडसर ठरणाऱ्यांना पध्दतशीरपणे दूर सारलं.

चांडाळ चौकडी कोण? अण्णा तुम्हीच ठरवा

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 07:09

अनंत गाडगीळ
अण्णांनी काँग्रेसमधील अनेक लोकांना चांडाळ चौकडी संबोधले आहे, एकप्रकारे त्यांनी टीकाच केली आहे, ज्यापद्धतीने 'टीम अण्णा' काँग्रेसवर टीका करत आहेत, त्याने या लोकांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काँग्रेस टार्गेटमुळे अण्णा आणि टीम अण्णांचे भष्ट्राचार विरोधी आंदोलन भरकटत चालल्याचे यावरून दिसते.

कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा

Last Updated: Wednesday, October 26, 2011, 08:34

महादेव शेलार
कार्यक्रम पालिकेचा, चेहरामोहरा सेनेचा, असचं सध्या मुंबईत दिसून येत आहे. याला काय म्हणायचे ? आता इलेक्शन फेब्रुवारी २०१२मध्ये आलयं, म्हणून हा उद्धाटनाचा सपाटा सुरू झाला आहे. सत्ता शिवसेनेची. पाच वर्षे हे झोपले होते का ?

बोरीवली तर बंद करून दाखवा

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 12:27

राम कदम
काँग्रेसचे नेते संजय निरुपम मुंबई बंद करण्याची भाषा करीत आहेत, पण माझे त्यांना उघड उघड आव्हान आहे. ते ज्या ठिकाणी राहतात, त्या बोरिवलीत त्यांनी बंद यशस्वी करून दाखवावा, हे काही नाही, निवडणुकीपूर्वीच स्टंट आहेत.

उत्तर भारतीयच मुंबईवर 'ओझं'

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 07:42

अरविंद सावंत
काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी नागपुरात जाऊन मुंबईबद्दल जी बाष्कळ, अपरिपक्व आणि बेताल वक्तव्य केलं, त्याबद्दल शिवसेना कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे यांनी चांगलंच कानफटवलं आहे.

राजकारण नको, मूल्यमापन करा...

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 11:07

सचिन सावंत
शिवसेना, मनसेच्या लोकांनी कुठलाही विचार न करता, कुठलीही शहानिशा न करता संजय निरुपम यांना शिव्या घालायला सुरूवात केली. या सगळ्यात त्यांचं राजकारण आहे. मूळात संजय निरुपम यांच्या वक्तव्याचं मूल्यमापन करायला हवं.

गडाफीच्या मृत्यूनंतर काय होणार ?

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 10:01

दिवाकर देशपांडे
गडाफींच्या मृत्यूने आणखी एका हुकूमशाहीचा अंत झाला. ट्युनेशियातला उठाव, इजिप्तमधला होस्नी मुबारकचा पाडाव अशी मोठ्या प्रमाणावर क्रांती घडत आहे. यातून एक क्रांतीची लाटच जगभर उसळली आहे का असं वाटायला लागचं.

अमेरिकन भांडवलशाहीच्या विरोधतला उद्रेक

Last Updated: Saturday, October 22, 2011, 14:42

सुधीर सावंत
लिबियाच्या मुआमर गडाफी जरी अमेरिकेच्या सहाय्याने सत्ताधीश झाला नसला तरी अमेरिकेनेच अनेक देशातल्या हुकूमशहांचा जन्मदाता आहे. अमेरिकेनेच आपल्या स्वार्थासाठी ट्युनेशिया आणि इजिप्तमध्यल्या हुकूमशहांना कायम पाठबळ पुरवलं

किरण बेदींचे वर्तन अयोग्यच

Last Updated: Saturday, October 22, 2011, 14:54

दिवाकर रावते
किरण बेदी या अण्णांच्या भ्रष्टाचार विरोधातील लढाईतील फौजेपैकी एक आहेत. भ्रष्टाचाराच्या विरोधातील आंदोलनकर्त्याने पावित्र्य जपावं ही लोकांची अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. किरण बेदींना मुलीचा दाखला मिळण्यासाठी तडजोड केल्याचं सांगितले, कदाचीत ते एका आईने आपल्या मुलीच्या प्रेमापोटी केलं असावं. पण तरीही हे गंभीर आहे.

पाहून मुंबईचा विकास, विरोधकांना होतोय त्रास

Last Updated: Saturday, October 22, 2011, 14:55

राहुल शेवाळे
महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या उद्घाटनाची माहिती आयुक्तांना १५ दिवस अगोदर देण्याचा नियम काही नवा नाही. यापूर्वी अशा प्रकारे वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत.