मुंडेच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकारणाला मोठा धक्का - गडकरी

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 09:19

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं निधन हा पक्षासाठी हा खूप मोठा धक्का आहे. पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते... महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची आम्हाला संधी मिळाली.

गोपीनाथ मुंडे यांचे कार अपघातानंतर निधन

Last Updated: Wednesday, June 4, 2014, 08:19

भाजपचे नेते केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ते गंभीर जखमी झाले होते. त्यांचे रुग्णालयात सकाळी 8 वाजता निधन झाले.

सोनियांच्या जावयाची सुरक्षा `जैसे थे`!

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:52

केंद्र सरकारनं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुलगी प्रियांका गांधी आणि जावई रॉबर्ट वडेरा यांची सुरक्षा ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय घेतलाय. सोबतच प्रियांका आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमानतळावर मिळणारी सूट यापुढेही कायम राहणार आहे.

गुड न्यूजः घरगुती गॅस सिलेंडर दरात कपात

गुड न्यूजः घरगुती गॅस सिलेंडर दरात कपात

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:22

मोदी सरकारमध्ये अच्छे दिन आने वाले है याचा प्रत्यय आज देशातील कोट्यवधी गृहीणांना झाला. विना अनुदानित घरगुती गॅसच्या किंमतीत २३ रुपये ५० पैशांनी करण्यात आली आहे. रुपया वधारल्यानं आयात किंमतीत घट झाली आहे. आणि त्यामुळं सिलेंडर दरात ही कपात करण्यात आली आहे. तसेच विमान इंधनाच्या किंमतीत १.८ टक्क्यांनी कपात करण्यात आली.

मोदींचा ‘लुंगी डान्स’, अम्मा एनडीएत येणार?

मोदींचा ‘लुंगी डान्स’, अम्मा एनडीएत येणार?

Last Updated: Monday, June 2, 2014, 15:56

तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचा अण्णा द्रमुक पक्ष पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीएमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. जयललिता उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

याकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती

याकूब मेमनच्या फाशीला सुप्रिम कोर्टाची स्थगिती

Last Updated: Monday, June 2, 2014, 14:58

याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रिम कोर्टानं स्थगिती दिली आहे. याकूब मेमनचा दयेचा अर्ज दहा दिवसांपूर्वीच राष्ट्रपतींनी फेटाळला होता. याकूबची याचिका आता घटना पीठाकडे विचारार्थ पाठवण्यात आलाय. १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी फाशी ठोठावण्यात आलेला याकूब मेमन एकमेव आरोपी आहे.

गोव्यात तालिबानी प्रकार, चोरीच्या आरोपात मुलांची नग्न धिंड

गोव्यात तालिबानी प्रकार, चोरीच्या आरोपात मुलांची नग्न धिंड

Last Updated: Monday, June 2, 2014, 12:46

गोव्यातल्या कुडचडे इथं धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. इथल्या दोन मुलांना ‘काब दे रामा’ इथं नेवून (गावाचे नाव आहे ) चोरीच्या संशयावरुन अमानुष मारहाण केल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ माजलीय. याबाबत स्वयंसेवी संस्थांनी आवाज उठवल्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवत एकाला अटक केलीय, तर अन्य तीन आरोपी फरार आहेत.

देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म

देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:28

देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.

`नमो वॉच` : नरेंद्र मोदींच्या कामाची दिशा स्पष्ट

`नमो वॉच` : नरेंद्र मोदींच्या कामाची दिशा स्पष्ट

Last Updated: Sunday, June 1, 2014, 18:14

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सुरुवातीचे दिवस लक्षवेधी ठरलेत. आपल्या कामाची दिशा कशी असेल हे पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. पाहुयात नरेंद्र मोदी सरकारच्या शपथविधीपासूनच्या प्रवासाचा वेध घेणारा खास रिपोर्ट `नमो वॉच`

पंतप्रधान मोदींच्या चाबकाचा पहिला फटका खासदार प्रियंका रावतना

पंतप्रधान मोदींच्या चाबकाचा पहिला फटका खासदार प्रियंका रावतना

Last Updated: Sunday, June 1, 2014, 16:11

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप कडक आणि शिस्तीचे आहेत हे तर सर्वांनाच आता माहिती झालंय. याचा प्रत्यय त्यांच्या खासदारांनाही येतोय. बाराबंकी इशल्या नव्यानं निवडून आलेल्या खासदार प्रियंका सिंह रावत यांनी वडिलांनाच आपलं खासदार प्रतिनिधी बनवल्यामुळं मोदी चांगलेच तापले.