अंथरुणात लघवी केल्याबद्दल चिमुरड्याच्या गुप्तांगाला चटके!

अंथरुणात लघवी केल्याबद्दल चिमुरड्याच्या गुप्तांगाला चटके!

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 17:34

पुण्यातील लोहगाव भागात बापानं आणि सावत्र आईनं अवघ्या पाच वर्षांच्या चिमुरड्याला अंथरुणात लघवी करतो म्हणून अमानुष मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय.

चार तासांत उकललं भूतबंगल्यातील हत्येचं रहस्य

चार तासांत उकललं भूतबंगल्यातील हत्येचं रहस्य

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 12:49

बाईकला कट मारल्याबद्दल पुण्यानजीक भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमधील भूतबंगल्यात एका तरुणाचा डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली. हा प्रकार मंगळवारी सकाळी सव्वाआठला घडला.

हाय प्रोफाईल मुन्नाभाई, चक्क पवारांपासून पतंगरावपर्यंतचे मोबाईल नंबर

हाय प्रोफाईल मुन्नाभाई, चक्क पवारांपासून पतंगरावपर्यंतचे मोबाईल नंबर

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 09:15

अमित जगन्नाथ कांबळे उर्फ मुन्नाभाई एम बी बी एस. पुण्यातला या चोवीस वर्षीय बोगस डॉक्टरनं अनेकांना फसवलंय. यासाठी तो पुण्यातील विवीध रूग्णालयात फोन करून नवीन दाखल झालेल्या रूग्णाची माहिती घ्यायचा. त्यानंतर स्वतः किडनितज्ज्ञ असल्याचं रूग्णाच्या नातेवाईकांना सांगून त्यांच्याकडून पैसे उकळायचा.

धुळ्यात धक्कादायक घटना, वाघ कुटुंब बहिष्कृत

धुळ्यात धक्कादायक घटना, वाघ कुटुंब बहिष्कृत

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 10:58

ज्या बहिष्कृत समाजासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं सारं आयुष्य वेचलं त्याच समाजात का कुटुंबाला बहिष्कृत करण्यात आलंय. आपल्याच समाजबांधवांनी बहिष्कृत केल्यानं सध्या हे कुटुंब दहशतीखाली जगतंय.

कार्तिकी एकादशी : पंढरपुरात उत्साह, विरोधानंतर अजित पवारांचा दौरा रद्द

कार्तिकी एकादशी : पंढरपुरात उत्साह, विरोधानंतर अजित पवारांचा दौरा रद्द

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 08:22

कार्तिकी एकादशी. "अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीन माहेरा आपुलिया` अशी आस उराशी बाळगून कार्तिकी यात्रेच्या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाख वारकरी पंढरपुरात दाखल झालेत. दरम्यान, वारकऱ्यांचा विरोधानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही कारणाने आपला दौरा रद्द केला.

अनधिकृत बांधकामांसाठी पालिकेचे नियम धाब्यावर

अनधिकृत बांधकामांसाठी पालिकेचे नियम धाब्यावर

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 20:13

पिंपरी - चिंचवडमध्ये महापालिकेची इमारतच अनधिकृत असताना पालिकेचं आणखी एक अनधिकृत बांधकाम समोर आलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी बांधलेल्या घरकुल योजनेतील इमारतींमध्येही महापालिकेनं सर्वच नियम धाब्यावर बसवल्याचं चित्र आहे.

पुणे- सातारा रस्त्यावर रिलायन्सला NHAने अडवलं!

पुणे- सातारा रस्त्यावर रिलायन्सला NHAने अडवलं!

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 19:54

पुण्याजवळच्या शिंदेवाडी इथली आई आणि मुलगी वाहून जाण्याची दुर्घटना असो किंवा, नुकतीच नीरा नदीत कार पडून झालेला चार मित्रांच्या मृत्यूची घटना… यामुळे पुणे-सातारा रस्ता चर्चेत आलाय. या रस्त्याच्या सहापदरी करणाचे काम सध्या सुरु आहे. या कामाबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

`अजितदादांना विठूरायाची पूजा करू देणार नाही`

`अजितदादांना विठूरायाची पूजा करू देणार नाही`

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 15:51

कोट्यवधी वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठलाची कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी संघटना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय.

३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?

३५ जणांच्या हत्येच्या कबुलीनंतर पोलीस पेचात, काय करायचे?

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 14:58

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी ६५ वर्षांच्या सुरक्षारक्षकाला एका खुनाच्या गुन्ह्य़ात संशयावरून ताब्यात घेतले. तो मूळचा बिहारमधील गया जिल्ह्य़ातील आहे. त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याने बिहारमध्ये केलेला गुन्हा उघडकीस आला. त्यांने आतार्पंयत ३५ जणांची हत्या केली. मात्र, पोलिसांनी त्याच्यावर अद्याप कारवाई केलेली नाही.

तिच्या अचानक जाण्यानं कोल्हापूरकर हळहळले...

तिच्या अचानक जाण्यानं कोल्हापूरकर हळहळले...

Last Updated: Sunday, November 10, 2013, 19:38

पुण्याहून परतताना कोल्हापूरच्या श्रुतिका चंदवाणी बरोबर अन्य तिघांचा अपघातात मृत्यू झाला. यातील श्रुतिका ही अव्वल दर्जाची स्केटिंगपट्टू होती. एवढंच नव्हे तर वयाच्या सहाव्या वर्षी श्रुतिका चंदवाणीनं ‘लिंबो स्केटिंग’मध्ये ‘वर्ल्ड रेकॉर्ड’ केला होता. तिच्या जाण्यानं स्केटिंग मधला एक तारा निखळा असल्याचं तिच्या प्रशिक्षकांबरोबर अन्य कोल्हापूरकरांना वाटतंय.