दाणापाण्याचा घोर, स्थलांतर करती मोर

Last Updated: Monday, February 18, 2013, 17:55

अवघा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय. सगळीकडं पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मोराच्या चिंचोलीची परिस्थितीही वेगळी नाही. पाण्याच्या दूर्भिक्षामुळं इथल्या मोरांवरही स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.

राज आणि बाळासाहेबांवर अजितदादांनी डागली तोफ

Last Updated: Monday, February 18, 2013, 18:56

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची नक्कल करत त्यांची टिंगल केली होती. राज ठाकरेंच्या सभांना गर्दीही चांगलीच जमली होती. मात्र गर्दीचं रुपांतर कधी मतांमध्ये होत नसतं अशी टीका आता त्यावर अजित पवारांनी केली आहे.

पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा शाही विवाह

Last Updated: Monday, February 18, 2013, 14:04

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.

तीन नेत्यांच्या वाढदिवसामुळे पिंपरीत फ्लेक्सचा महापूर

Last Updated: Sunday, February 17, 2013, 20:07

तीन मातब्बर नेत्यांच्या वाढदिवासामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण ढवळून निघालं. एकापाठोपाठ आलेल्या या वाढदिवसांनी शहरात सर्वत्र फ्लेक्सचा पूर आला होता. वर्तमानपत्रांची पानं जाहीरातींनी भरुन गेली होती. मात्र या वाढदिवसांनी सामन्य जनतेला काय मिळालं हा प्रश्न कायम आहे.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची नार्को टेस्ट करा- महाडिक

Last Updated: Sunday, February 17, 2013, 00:09

कोल्हापुरात तीन दिवसांपूर्वी भरदिवसा झालेल्या अशोक पाटील यांच्या खून प्रकरणी गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांचा संबंध असल्याचा आरोप काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक गटाचे धनंजय महाडिक यांनी केला आहे.

नेत्यांची हाकालपट्टी करण्याची हिम्मत दाखवणार- प्रकाश आंबेडकर

Last Updated: Saturday, February 16, 2013, 22:12

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या उद्धळपट्टीची उदाहरणं समोर येत आहेत.

अनैतिक संबंधात अडथळा, चिमुरड्याचा शारीरिक छळ

Last Updated: Saturday, February 16, 2013, 20:21

विवाहबाह्य संबंधामध्ये अडथळा ठरणाऱ्या सहा वर्षीय मुलाचा शारीरिक छळ केल्याची धक्कादयक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे.

व्यावसायिक स्पर्धेतून बावीस वर्षीय तरुणाचा खून

Last Updated: Saturday, February 16, 2013, 19:55

गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बजाजनगर मधील अमोल भगवान भाले या बावीस वर्षीय तरुणाचा खून झाल्याचं शुक्रवारी उघडकीस आले.

पवारांच्या सूचना डावलून आमदारांचा `दिखाऊपणा` सुरूच...

Last Updated: Saturday, February 16, 2013, 13:52

राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचं राजेशाही थाटात लग्न सोहळे आणि वाढदिवस साजरा करणं सुरूच आहे.

कारच्या धडकेत पाच वारकरी ठार, नऊ जखमी

Last Updated: Saturday, February 16, 2013, 08:28

सोलापूर - हैदराबाद मार्गावर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झालाय. एका कारच्या धडकेत पाच वारकरी जागीच ठार तर नऊ जण जखमी झालेत.