SIES कॉलेजमध्ये रॅगिंग

Last Updated: Tuesday, November 29, 2011, 05:59

नवी मुंबईच्या SIES कॉलेजमध्ये रॅगिंग झाल्याचं उघड झालं. कॉलेज प्रशासनानं याबाबत जास्त बोलण्यास नकार दिला. मात्र, संबंधित विद्यार्थ्यांना शोधून कारवाई करणार असल्याचं म्हटलं.

ब्रेन कॅफे सायन्टीस्ट स्पर्धेला सुभाष चंद्रांची उपस्थिती

Last Updated: Sunday, November 27, 2011, 12:46

विद्यार्थांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी ब्रेन कॅफेतर्फे सायन्टीस्ट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं, विद्यार्थांचे कलागुणा साऱ्या जगासमोर यावेत याच उद्देश या स्पर्धेचं आयोजन करण्यात आला होतं. यामुळे या स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद होता.

रुईयाचा 'नाका म्हणे'

Last Updated: Saturday, November 26, 2011, 08:40

रुईया कॉलेजची अभिनयसंपन्न पंरपरा ज्या नाक्याने जवळून पाहिली तोच नाका आता बोलका होणार आहे. कारण याच कॉलेजच्या अमृतमहोत्सवा निमित्त 'नाका म्हणे' ही कलाकृती सादर होणार आहे. कॉलेजच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने या कॉलेजमधले सगळे रंगकर्मी एकत्र येऊन सादर करत आहेत.

फेसबुकवर तुला शिकवीन चांगलाच धडा

Last Updated: Thursday, December 15, 2011, 10:28

वांद्र्याच्या शहानी इंजिनिअरींग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या फी वाढीला विरोध करण्यासाठी फेसबुकचा आधार घेतला आहे.फी वाढीच्या मुद्द्याला आता सोशल नेटवर्किंग वेबसाईच्या माध्यमातून वाचा फोडली. प्रोटेस्ट अगेन्स्ट फी हाईक ईन टीएसईसी... हा विद्यार्थ्यांनी सोशल नेटवर्किंग बेवसाईट वर फी वाढीला केलेला विरोध आहे. बांद्राच्या शहानी इंजिनिअरींग कॉलेजने अचानक फी वाढ केल्याने विद्यार्थी संतापलेत.

अभियांत्रिकीच्या ‘दुकाना’त ग्राहकच नाही

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 13:05

राज्यातील मोठ्या शहरांमध्ये अभियांत्रिकीच्या जागा भरण्यात कोणतीही अडचण भासत नसली तरी छोट्या गावातील परिस्थिती वेगळी आहे. वाशिम, हिंगोली आणि परभणी सारख्या गावांमध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ७७-८८ टक्के जागा रिकाम्या आहेत.

फीचे जड झाले ओझे...

Last Updated: Tuesday, November 8, 2011, 13:00

अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या फीमध्ये झालेल्या वाढीने अधिकाधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

४४ ‘डिम्ड’ विद्यापीठांची पावर होणार ‘डीम’?

Last Updated: Monday, November 7, 2011, 07:12

देशातील ४४ डिम्ड युनिव्हर्सिटींमध्ये शिक्षणाचा आवश्यक दर्जा राखला जात नसून, तेथे सरंजामी कारभार सुरू आहे, असा निष्कर्ष सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने काढला आहे. केंद्र सरकारचीही अशीच भूमिका असल्याने या 'क' गटातील या ४४ डिम्ड युनिवर्सिटींचा दर्जा काढून घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.

प्रेमजी के स्कूल चले हम!

Last Updated: Monday, October 31, 2011, 11:24

वाहनांतून झोकात पटपडताळणी, बिलाला टोलवाटोलवी

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

राज्यात मोठ्या जोमात सरकारने पटपडताळणीची मोहीम राबवली गेली. मात्र पटपडताळणीसाठी वापरल्या गेलेल्या खासगी वाहनांची बिलं मात्र तशीच पेंडींग असल्याचं उघड झालंय. वाहनचालकांना जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालयांकडून टोलवाटोलवीची उत्तरं मिळतायत.

लाचखोर अधिकाऱ्यांना घरचा रस्ता

Last Updated: Friday, October 21, 2011, 09:06

पाच वर्षांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल झालेल्या शिक्षण खात्याच्या १६ लाचखोर अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांना कायमचा घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.