भारतीय मोठ्या प्रमाणावर जाळ्यात (इंटरनेटच्या हो)

Last Updated: Friday, November 11, 2011, 17:28

भारतात २०१४ पर्यंत नेटचा वापर करणाऱ्यांची संख्या ३०० दशलक्षांवर जाऊन पोहचेल अशी गुगलचा अंदाज आहे. सध्या भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या १०० दशलक्ष आहे त्यात तिप्पट वाढ होणं अपेक्षित असल्याचं गुगलचे कंट्री हेड राजन आनंदन यांनी द वॉल स्ट्रीट जर्नलला सांगितलं.

मायक्रोसॉफ्टचा ग्राहकांना गोड पर्याय- मँगो

Last Updated: Friday, November 4, 2011, 13:49

मायक्रोसॉफ्टचा विंडोज फोन ७.५ फोन बाजारात दाखल झाला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार यातल्या नव्या सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला शेकड्यांनी नव्या फिचर्सचे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

जीमेल आता नव्या ढंगात नव्या रंगात

Last Updated: Thursday, November 3, 2011, 05:13

जीमेल म्हंटल की अगदी प्रोफेशनल वाटणाऱ्या ई-मेल साईटपैकी अशी एक साईट आजपर्यंत जीमेलने आपल्या ग्राहकांना नेहमीच नवनव्या सुविधा देऊन आपलसं केलं आहे. त्यामुळेच आता जीमेल तुमच्यासमोर येत आहे नव्या ढंगात आणि नव्या रंगात.

गॅलेक्सी नोट

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने देशात ‘गॅलेक्सी नोट’ हे उत्पादन बाजारात आणलं आहे. ‘गॅलेक्सी नोट’चा टॅबलेट पीसी आणि मोबाईल हँडसेट असा दुहेरी वापर करता येणार आहे. गॅलेक्सी नोट किंमत ३४,९९० रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

ब्लॅकबेरी आलं वठणीवर

Last Updated: Saturday, October 29, 2011, 11:51

लिमिटेड ऍक्सेस देण्याच्या मुद्यावर अखेर ब्लॅकबेरीनं भारत सरकारसमोर नमतं घेतलं आहे. ब्लॅकबेरीनं भारत सरकारला त्यांच्या सर्व्हरचा लिमिटेड ऍक्सेस दिला. ब्लॅकबेरीची ई-मेल आणि ब्लॅकबेरी मेसेंजर या दोन जगभरातील खात्रीशीर सेवा मानल्या जातात. विशेष म्हणजे या दोन्ही सेवा एन्क्रिप्टेड आहेत.

फ्रेंडशीप, जरा जपूनच !

Last Updated: Friday, October 21, 2011, 10:54

फेसबुकवरील फ्रेण्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करताना जरा जपून करा. कारण त्या माध्यमातून सायबर अ‍ॅटॅक होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. ट्रोजनचा वापर करून अशाप्रकारचे सायबर अ‍ॅटॅक केले जात असल्याचे एका आयटी कंपनीने नुकतेच स्पष्ट केले.

आता नवे दूरसंचार धोरण !

Last Updated: Tuesday, October 11, 2011, 06:08

देशभरात कुठूनही कुठेही 'रोमिंग फी'विना मोबाइलवरून बोलता येईल. लोकल आणि एसटीडी कॉलमधील फरकही बंद होईल. वेगवान इंटरनेट सुविधाही (ब्रॉडबँड) उपलब्ध होणार असून ती फक्त शहरी भागांसह ग्रामीण भागांतही पुरवली जाणार आहे.

रोमिंग देशभरातून गोईंग

Last Updated: Friday, October 7, 2011, 11:24

लवकरच देशभरात कुठेही गेले तरी रोमिंगसाठी चार्जेस द्यावे लागणार नाहीत , अशाप्रकारचे धोरण सरकार तयार करत आहे . दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल आठवडाभरात नॅशनल टेलिकॉम पॉलिसी २०११ जाहीरकरण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये रोमिंग फ्रीसह , इंटरसर्कल एमएनपी आणि इतर घोषणा असण्याची शक्यता आहे.

आता अण्णांची 'ब्लॉगा'वत !

Last Updated: Saturday, October 1, 2011, 15:06

अण्णा हजारे अधिकृतपणे ट्विटर, फेसबुक आणि ब्लॉगवर आले आहेत. त्यांनी बुधवारी पहिल्यांदा ट्विटरवर अकाऊंट सुरू केलं, तसंच फेसबुकवर फॅनपेज सुरू केलं. आपली भूमिका अधिक विस्तृतपणे मांडण्यासाठी त्यांनी वर्डप्रेसवर आपला ब्लॉगही सुरू केलाय.

कार्बनडाय ऑक्साईडचं काळं सत्य

Last Updated: Tuesday, September 27, 2011, 13:02

१९९० ते २०१० या वर्षांमध्ये कार्बनडाय ऑक्साईड गॅसचे उत्सर्जन हे सगळ्यात जास्त होते. दोन दशकमध्ये या उत्सर्जनामध्ये ४५ टक्के वाढ झालेली आहे. २०१० मध्ये कार्बनडाय ऑक्साईडचे उत्सर्जन ३३ अब्ज टन होतं. जे की आतार्यत सर्वाधिक आहे.